भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममुक्ताईनगर

जुगार अड्ड्यावर पोलीसांची धाड ; ७ जणांवर गुन्हा दाखल !

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुक्ताईनगर,मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। तालुक्यातील रुईखेडा येथे जुगार अड्यावर पोलिसांनी धाड टातकून सात जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून १४ हजार २३० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.या बाबत मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुक्ताईनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील रुईखेडा गावी येथील राजाराम गणू लोखंडे यांच्या घराच्या मोकळ्या जागेमध्ये जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना मिळाली. त्यानुसार बुधवार १६ मार्च रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास पोलिसांनी धाड टाकून सुमारे १४ हजार २३० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र विठ्ठल धनगर यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सुनील विलास वराडे (वय-३५), गजानन त्र्यंबक वराडे (वय ४५), अनिल शामराव लोखंडे (वय-४१), गोपाळ सोपान पाटील (वय-३५), राजाराम गणू लोखंडे (वय ५८), शोक रमा सरोदे (वय-६०) आणि शालिक सलीम वंजारी वंजारी (वय-३२) सर्व रा. रुईखेडा ता.मुक्ताईनगर यांच्या विरोधात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!