भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगर

Video। मुक्ताईनगरात प्रहार जनशक्ती पक्षातर्फे ताली-थाली बजाव आंदोलन

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुक्ताईनगर/प्रतिनिधी: तुर, मुंग आणि उडीद कड धान्याची आयात बंद करून किंमती कमी करण्याच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ति पक्षातर्फे शहरातील परिवर्तन चौकात ताली-थाली बजाव आंदोलन करत अनिल दौलत कान्हे.(युवा तालुका अध्यक्ष मुक्ताईनगर) यांनी यामागण्यांचे निवेदन पोलीस निरीक्षकांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, यंदाचा खरिप हंगाम जवळ आला असुन पेरणीपुर्व शेती मशागतीच्या कामांनी वेग घेतला आहे. परंतु पेरणीसाठी लागणारे बियाणे, खते यांच्यासाठी लागणार्‍या आर्थिक बाबींची जुडवणुक करण्यासाठी शेतकरी बांधव लागला आहे. परंतु केंद्र शासनाने रासायनिक खतांवरील सबसिडी कमी केल्या मुळे खत उत्पादक कंपन्यांनी रासायनिक खतांच्या किंमतीत मोठी भाववाढ केली आहे. यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक कंबरडे मोडणार आहे. शेतकर्‍यांच्या या समस्येची दखल करून खतांच्या वाढीव किंमती कमी करण्यात याव्या व येत्या खरिप हंगामासाठी शेतकर्‍यांना उच्च उगवण क्षमता असणारे बियाणे रास्त भावात उपलब्ध करून देण्यात यावे व तुर उडीद डाळ यांची आयात बंद करून किमती कमी कराव्या अशी मागणी केली आहे.

यंदाचा खरीप हंगाम तोंडावर आला असून शेतकरी बियाणे आणि खते खरेदीसाठी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. त्यातच रासायनिक खतांच्या किमतीत मोठी वाढ झाली असल्या कारणाने शेतकर्‍यांचे या खरीप हंगामाचे संपूर्ण आर्थिक नियोजन कोलमडून जाण्याची शक्यता आहे. दरम्यान केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून. केंद्र सरकारच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने ताली थाली बजाव आंदोलन करण्यात आले.
    

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!