खा. रक्षा खडसेंच्या प्रयत्नांना यश, श्रीक्षेत्र चांगदेव,महानुभाव व शिव मंदिराचे पुरातत्त्व विभागा कडून पुन्हा सर्वेक्षण
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। मौजे चांगदेव (मुक्ताईनगर) येथील कित्येक वर्षे दुर्लक्षित असलेल्या श्रीक्षेत्र चांगदेव देवस्थानासह पर्यटनस्थळाचे भाग्य उजळले असून, खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. चांगदेव पर्यटनस्थळाच्या विकासाच्या दृष्टीने पुरातत्त्व विभागाचे पथकाकडून प्राथमिक सर्वेक्षण करण्यासाठी पूर्ण करण्यात येऊन डीपीआर तयार झालेला असून, त्याबाबत आज केंद्र सरकारच्या पुरातव विभागाकडून आज श्रीक्षेत्र चांगदेव देवस्थान व महानुभाव जागृत देवस्थानाची खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत पाहणी करण्यात आली.
हे मंदिर हेमाडपंती, एकाच दगडात कोरलेले असून, मंदिराच्या चोहोबाजूंनी दगडी मूर्ती कोरलेल्या असून परिसराचा मंदिर व मुर्त्यांचा बराच कोरीव भाग जीर्ण झालेला होता. खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी चांगदेव पर्यटनस्थळाचा विकासाचा मुद्दा केंद्रीय मंत्रालय व पुरातत्व विभागाकडे लावून धरला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, देवस्थान जीर्नोधाराचे कामास मंजुरी मिळालेली असून लवकरच परिसरात विकास कामे सुरु होतील, याबाबतचा डीपीआर आज खासदार श्रीमती रक्षाताई खडसे खडसे यांनी हाताळून उपस्थित अधिकाऱ्यांना योग्यत्या सूचना केल्या तसेच, येथेच असलेल्या महानुभाव पंथाच्या जागृत देवस्थान व शिव मंदिराचे जिर्णोधार करण्याच्या दृष्टीने लोकसभेत प्रश्न उपस्थित करण्यासाठी प्रस्ताव बनविणे बाबत पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांना योग्यत्या सूचना दिल्या.
यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह पुरातत्त्व विभागाचे वरिष्ठ संवर्धन सहाय्यक श्री. दानवे, डॉ.शिवकुमार भगत, श्री.शशिकांत महाजन, श्रीकांत महाजन, श्री.राजेंद्र चौधरी, श्री.नांदू चौधरी, श्री.कैलास जावळे, श्री.गणेश चौधरी, श्री.जे.के.चौधरी, श्री.योगेश म्हसरे ई. उपस्थित होते.