भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगर

पेट्रोल डिझेल व खतांची दरवाढ रद्द करा– मुक्ताईनगर राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन !

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुक्ताईनगर/प्रतिनिधी: खरिप हंगामाच्या तोंडावर केंद्र शासनाने रासायनिक मिश्र खतांच्या किंमतीत आणि पेट्रोल डिझेलच्या दरात मोठी दरवाढ झाली आहे. या दरवाढीचा निषेध करत हि दरवाढ रद्द न झाल्यास आंदोलनाचा ईशारा देत मुक्ताईनगर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, गेल्या एक वर्षापासून असलेली कोरोनाची टाळेबंदी, आणि अवकाळी पर्जन्य, वादळ यामुळे शेतकऱ्यांच्या शेती मालाला मोठा फटका बसला असल्या कारणाने झालेले उत्पन्न आणि खर्च यांचा ताळमेळ बसवताना शेतकरी वर्ग आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाला आहे. परंतु भाजपा शासित केंद्र शासनाने रासायनिक खतांच्या किंमतीत भरमसाठ दरवाढ केल्यामुळे आधीच आर्थिक गर्तेत अडकलेला शेतकरी अजुन संकटात सापडला आहे, पूर्वी 1185 ला मिळणारी डी ए पी ची गोणी आता 1900 रुपयाला मिळणार आहे, 10 : 26:26 च्या 50 किलो गोणीची किंमत 1175 होती तीआता 1775 ला मिळणार आहे अशाप्रकारे सर्वच मिश्रखतांच्या किंमतीत 15 ते 17 टक्के दरवाढ केली आहे, हि दरवाढ शेतकरी बांधवांचे कंबरडे मोडणारी असून ट्रॅक्टर ला डिझेल ची आवश्यकता असते डिझेल च्या किंमतीत प्रचंड वाढ केली असल्याने शेती मशागतीचे ट्रॅक्टरचे दर सुद्धा वाढले आहेत. पेट्रोलच्या किंमतीने शंभरी पार केली असून पेट्रोल डिझेलची हि दरवाढ सामान्य जनतेच्या आवाक्या बाहेरची आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही दरवाढीचा जाहीर निषेध करतो व शासनाचा प्रतिनिधी या नात्याने आपणास विनंती करतो आपण आमची मागणी केंद्र शासनाकडे पोहचवून हि दरवाढ रद्द करण्यात यावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला आहे

यावेळी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा रोहिणी ताई खडसे खेवलकर, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, तालुकाध्यक्ष यु डी पाटील, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, माजी प स सभापती राजेंद्र माळी, प्रदिप साळुंखे,माजी सरपंच प्रविण पाटील, बापु ससाणे, आसिफ बागवान, शिवराज पाटील,संजय कोळी, राजु कापसे, सुनिल काटे, सुनिल पाटील, राजु चौधरी, व पदाधिकारी उपस्थित होते

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!