मुक्ताईनगरात महावितरण कंपनी कर्मचाऱ्यांची आढावा बैठक
मुक्ताईनगर प्रतिनिधी : महाराष्ट्रात वीजवितरण करणारी महावितरण कंपनीनी आर्थिक स्थितीवर थकबाकीचा वाढता डोंगर गंभीर परिणाम कारक ठरत आहे. परिणामी दैनंदिन खर्चासह, कर्मचार्यांचे पगार , वीज खरेदीसारख्या अत्यावशक बाबींसाठी कर्ज काढण्याची वेळ महावितरणवर आली आहे. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळाचा कार्यक्षम वापर करून थकबाकी
वसुलीच्या कामाला गती देत निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महावितरण कंपनी वेगाने काम करीत आहे.
दिनांक. २१-१२-२०२१ रोजी जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियांता यांनी मुक्ताईनगर विभागाचे कार्यकारी
अभियंता श्री. गुप्ता यांचे समक्ष मुक्ताईनगर , बोदवड , वरणगाव उपविभागातील जनमित्र ते अभियंता कर्मचारी
अधिकारी यांना तातडी ने बोलावून बैठक घेतली. कंपनीची आर्थिक वास्तविकता किती कठीण काळाचा सामना करीत
आहे व कंपनी किती मोठ्या प्रमाणात तोटा सहन करून ग्राहकांना सेवा देत असूनही मुक्ताईनगर विभागाची एकूण थकबाकी 342. 56 कोटी असणे खूप चिंताजनक असल्याचे मुख्य अभियंता श्री हुमने सांगितले त्यानुसार कर्मचाऱ्यांना वसुली अथवा देयक न भरणाऱ्या ग्राहकांचे कनेक्शन पर्यायी खंडीत करण्याचे आदेश दिले
सदर बैठकीत कोथळी येथील जागरूक ग्राहक श्री पंकज रघुनाथ चौधरी यांनी कृषी पंप विज धोरण 2021 योजनेचा लाभ घेत एक लक्ष सात हजाराचा वीज बिल भरणा केला थकबाकी मुक्त झाले जळगाव परिमंडळाचे मुख्य अभियंता यांनी त्यांचा सत्कार करून जाहीर आभार व्यक्त केले व सर्व कृषी ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले