Video।…..तर त्यांचा जाहीर सत्कार करेल- आ. पाटील यांना रोहिणी खडसेंचे आव्हान
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुक्ताईनगर/अक्षय काठोके: नाथाभाऊ आणि रक्षाताई यांनी मंजूर केलेल्या कामाचे काही लोक श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असून दुसऱ्यांनी केलेल्या कामाचे कुणी श्रेय घेऊ नये अश्या शब्दात ऍड. रोहिणी खडसेंनी आ.पाटील याच्यावर नाव न घेता तोफ डागली आहे. त्यांना श्रेय घ्यायचंय असेल तर राहिलेल्या पुलास मंजूर करून आणावे तर मी त्यांचा जाहीर सत्कार करेल असे थेट आव्हानचं रोहिणी खडसेंनी आ.चंद्रकांत पाटील यांना दिले आहे.
याबाबत अधिक असे की, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जुनेगाव नागेश्वर मंदिर मार्ग ते तीर्थश्रेत्र श्री मुक्ताई मंदिराच्या दरम्यानच्या शेकडो वर्षांपासून चा वारकऱ्यांचा मुख्य मार्ग असलेल्या रस्त्यावरिल पुलाचे उदघाटन करण्यात आले यावरून आता जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर यांनी आ.पाटील त्यांच्यावर तोफ डागत जोरदार टीका केली आहे. त्या आज पत्रकारांशी बोलतांना म्हणाल्या… हा पूल नाथाभाऊ आणि रक्षाताई यांच्या प्रयत्नांनी बांधण्यात आला असल्याने कुणीही त्यांच्या कामाचे श्रेय घेऊ नये तर, त्यांना श्रेय घ्यायचंय असेल जनतेसाठी काम करायच असेल तर त्यांनी मेळसांगवे ते ऐनपूर दरम्यानच्या पुलाचे काम करून आणावे हा पूल बांधून दाखविल्यास आपण त्यांचा जाहीर सत्कार करून असे खुले आव्हानच रोहिणी खडसे यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांना दिले आहे.