भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमुक्ताईनगरराजकीय

कुऱ्हा येथील मंजूर कोविड सेंटर फी आकारून ऐवजी विनामुल्य करावे अन्यथा शिवसेना आंदोलन करणार

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुक्ताईनगर/प्रतिनिधी : राज्यात कोरोना संसर्गाने बाधित रुग्ण वाढीचा आकडा चिंताजनक असून मुक्ताईनगर येथील चारही डेडीकेटेटेड अतिदक्षता कोविड सेंटर व ccc सेंटर येथे बेड उपलब्ध होणे जिकरीचे झालेले आहे तालुक्यातील कुऱ्हा येथे कोविड केअर सेंटरला ही मंजूरी मिळाली आहे मात्र, आता शिवसेनेकडून या मंजूर परिपत्रकात ‘फी आकारून’ अशी अट टाकण्यात आल्याचा आरोप करत यावर आक्षेप नोंदवत सदरील कोविड सेंटर विनामूल्य करावे असे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा येथील संदर्भीय कोविड केअर सेंटर (CCC)  मंजूर झालेले आहे मात्र मंजुरी देताना ”फी आकारून”  अशी अट टाकण्यात आलेली असून संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव रुग्णांकडून फी आकारणीचा गंभीर प्रकार पैसे कमाविण्याचा गोरख धंदा असल्याने कुऱ्हा भागातील आदिवासी व मागास भागावर अन्याय करण्यासारखा आहे. तसेच या मागे रुग्णांची आर्थिक लूट करण्याचा हेतू दिसून येत असून याची सविस्तर चौकशी होउन तात्काळ “ फी आकारून ” हा शब्द काढून मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली प्रमाणे विनामूल्य सेवेचे कोविड केअर सेंटर (CCC)  तात्काळ मंजूर व्हावे अन्यथा शिवसेनेतर्फे येत्या दोन दिवसात शिवसेना स्टाईल ने आंदोलन करण्यात येईल असा इशाऱ्यांचे निवेदन तहसीलदार श्वेता संचेती यांना देण्यात आले असून  पालकमंत्री ना गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी डॉ अभिजित राऊत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ जमादार, आमदार चंद्रकांत पाटील, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ निलेश पाटील, डॉ योगेश राणे वैद्यकीय अधिक्षक, उपजिल्हा रुग्णालय, मुक्ताईनगर यांना निवेदनाच्या प्रति माहितीस्तव देण्यात आल्या आहेत

यावेळी तालुका प्रमुख  छोटू भोई, विधानसभा क्षेत्रप्रमुख  सुनील पाटील, अल्पसंख्यांक संघटनेचे जिल्हा संघटक अफसर खान, उपतालुका प्रमुख नवनीत पाटील, जीवराम कोळी, शिवाजी पाटील, प्रफुल्ल पाटील, विभाग प्रमुख महेंद्र मोंढाळे, शहर संघटक वसंत भलभले, शहर प्रमुख गणेश टोंगे , राजेंद्र हिवराळे, युवा सेना उपजिल्हा प्रमुख पवन सोनवणे, युवा सेना तालुका प्रमुख पंकज राणे, कुऱ्हा शहर प्रमुख पंकज पांडव, हारून शेख, नारायण पाटील, अविनाश वाढे, दीपक पवार आदींसह असंख्य शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!