भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगर

इच्छापूर 132 KV उपकेंद्रात शिवसेनेची ट्रान्सफार्मरची मागणी आणि आ. चंद्रकांत पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी : तालुक्यातील चारठाणा, इच्छापूर, निमखेडी बु., महालखेडा, टाकळी, चिंचखेडा बु., वायला , नांदवेल परिसरातील शेत शिवार व गावठाण साठी विद्युत पुरवठा करणाऱ्या मौजे इच्छापूर येथील 132 KV उपकेंद्रांत 5 KV ट्रान्सफार्मर असूनही सदरील ट्रान्सफार्मर वर अतिरिक्त भार येत असल्याने अवघ्या 10 मिनिटात विद्युत पुरवठा ट्रिप होणे व खंडित होण्याचे प्रकार वाढलेले असून यामुळे शेत शिवारातील कृषी पंप जळणे, रोहित्र जळणे हा प्रकार नित्याचाच झालेला असून शेती पिकांना पाणी भरणा होत नसल्याने पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे येथे तात्काळ नवीन 5KV ट्रान्सफार्मर मिळावा अशा मागणीचे निवेदन शिवसेना उपतालुका प्रमुख शिवाजी पाटील यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांना दिले.

प्रसंगी इच्छापुर सरपंच गणेश पाटील, चारठाणा सरपंच सूर्यकांत पाटील, महालखेडा सरपंच प्रमोद कोळी,गणेश सोनवणे (निमखेडी बु) यांचेसह किशोर पाटील(महालखेडा), अमोल येणकर, शिवाजी भडांगे, प्रमोद सोनार (निमखेडी) यांचेसह टाकळी, चिचखेडा बु, नांदवेल येथील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार चंद्रकांत पाटील यांनी लागलीच घेतली दखल
आमदार चंद्रकांत पाटील यांनी शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेत महावितरण च्या अधिकाऱ्यांना निवेदन कर्त्यांसमोर लागलीच 5 KV च्या ट्रान्सफार्मर चे इस्टीमेट तयार करून प्रस्ताव जिल्हा नियोजन कडे सादर करण्याच्या सूचना केल्या. व पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून तात्काळ प्रश्न मार्गी लावण्यासाठी हालचाली गतिमान केल्या.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!