श्री संत मुक्ताबाई समाधी स्थळाची श्रीक्षेत्र महतनगर पंचकोशी परिक्रमा 23–24–25– जानेवारी 2023
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी । परिक्रमेचे पौराणिक महत्त्व
सनातन वैदिक धर्मात पवित्र धार्मिक स्थळांना श्रद्धा भक्तीपूर्वक चारही बाजूने पायी चालण्यास परिक्रमा किंवा प्रदक्षणा म्हणतात आपल्याकडे पूर्वीपासूनच धार्मिक तिर्थक्षेत्र नदी पर्वत यांना पंचक्रोस चौर्यासीकोस अशा विविध परिक्रमा करण्याची परंपरा आहे अयोध्या रुंदावन चित्रकुट ओंकारेश्वर नर्मदा तापी गंगा उज्जैन यासह आळंदी सासवड त्र्यंबकेश्वर पंढरपूर त्याचप्रमाणे श्रीक्षेत्र मुक्ताई समाधीस्थळ पूर्वीचे नाव महतनगरची परिक्रमा आहे परिक्रमा ही दक्षिणावर्त म्हणजेच घड्याळाच्या काट्याप्रमाणे करावी असे निर्देश आहेत देवस्थान देवता नदी पर्वतांना आपल्या उजव्या हाताला ठेवून परिक्रमा केल्या जाते त्यामुळे त्या परिसरात असणाऱ्या देवता तीर्थ ऋषीमुनी जपीतपी सिद्ध साधक यांना परिक्रमा होते. ही एक प्राचीन उपासना आहे परिक्रमेत कायीक वाचिक मानसिक तप घडते.प्रत्येकाने व्रतस्थ राहून नामचिंतनात परिक्रमा करावी त्याचे फार मोठे फल आहे अनेकपट फलदायी आहे.
परिक्रमाचे अजूनही एक वैज्ञानिक दार्शनीक महत्त्व आहे ते म्हणजे संपूर्ण ब्रह्मांडातील प्रत्येक ग्रह नक्षत्र हे कुणा ना कुणा तार्यांची परिक्रमा करीत भ्रमण करीत असतात.मानवी जीवन हेही एक चक्रच आहे आणि हे चक्र समजण्यासाठी परिक्रमा हे प्रतीक आहे. संपूर्ण सृष्टी भगवंताने बनवलेली आहे त्यापासून सर्व जीव प्राणी उत्पन्न झाले आहे या सर्वांना नतमस्तक होण्यासाठी परिक्रमा करून कृतार्थ व्हावे याविषयी शतपथ ब्राह्मण ग्रंथात विस्तृत माहिती आलेली आहे.
महतनगर परिक्रमा
आदिशक्ती जगन्माता ब्रह्मचित्कला मुक्ताबाई ज्या परिसरात विजेच्या प्रचंड कडकडाटात अंतर्धान झाल्या त्या परिसराचं तत्कालीन रमणीय रूपाचं वर्णन संत नामदेव महाराजांनी आपल्या अभंगाद्वारे केलेले आहे ज्यावेळी आईसाहेब मुक्ताई गुप्त झाल्या त्यावेळी श्री पांडुरंग परमात्मा राही रखमाबाई सत्यभामा माता गण गंधर्व जपीतपी ऋषीमुनी सिद्ध साधक श्रीमंत निवृत्तीनाथ महाराज आदी सर्व संत मंडळी या परिसरात एक महिना वास्तव्याला होते त्यांच्या चरणस्पर्शाने वास्तव्याने परिसरातील रज:कण ,वृक्षवेली दगडमाती पवित्र झालेली आहे.त्या महतनगर परिसराचे वर्णन खूपच सुंदर केलेले आहे.
फुलले अनेक तरुण तेथे। दुर्वादर्भ आत उगवले ।।
करंज जांभळी लागली एक थाटी। वरी बहु दाटी तरुवरांची॥
अमृत फळे अपार विस्तारले फार ।त्या माजी मयूर टाहो देती ॥
कंठ कोकीळा त्या सुस्वर गायन ।तरुवर सुमने परिमळ॥
पारिजातकांची दाटी झाली भारी।
आत मैलागिरी डोलताती॥
नामा म्हणे देवा भला हा एकांत।
मार्कंडेय येथे तप केले॥ धन्य महतनगर धन्य सोमेश्वर ।
धन्यतापी तीर योगीयांचे।सोनियाची झाडे अनेक कर्दळी*
त्यात रान केळी फोफावल्या॥
सीताफळी भरीत अनेक स्थळी।
दाट दिसती झाडी रामफळे॥
गंधर्व गायने आला पीत सुस्वरी।
नामा म्हणे देवा मन झाले स्थिर।
पडला विसर अविद्यवितेचा॥
उष्ण काळी छाया आवडती फार ।
म्हणती ऋषीश्वर रम्य स्थळ॥
नामा म्हणे देवा रंगले अंतकरण।
उत्तरली विमाने गंधर्वाचे॥
अशाप्रकारे गंगाधरेच्या प्रवाहात नाना वर्णाची फुले कमळे त्यावर भ्रमर गुंजारो करीत होते टेकडीवरून तापीचे सुंदर दृश्य दिसायचे उंच वाढलेली झाडे नवीन आलेली पालवी मन त्या ठिकाणी रमून जात होते या महतनगर परिक्रमेमध्ये परशुरामतीर्थ योगी चांगदेव महाराज तपस्थली सुंदर नारायण मंदिर गंगाधर मार्कंडेय सोमेश्वर तापी आणि पूर्णा या महानद्या सिद्धेश्वर भवानी मंदिर चतुःसीमा विसावा पादुका श्रावणबाळ समाधी भवानी मंदिर हनुमान मंदिर श्रावण मार्कंडेय ऋषी परशुराम तीर्थ गंगाधर ऋषीमुनींचे अशा अनेक स्थळांचं दर्शन व परिक्रमा या समाविष्ट आहे परिसरामध्ये गुप्त असलेले आणि सुप्त असलेल्या तपोभूमी तपस्वींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आहेत
परिक्रमेचे फल
इची करता पंचक्रोशी । चुके जन्म मरण 84॥
चारी मुक्ती होती दासी। * येऊनी चरणाशी लागती त्या॥ असे फार मोठे फल संतांनी वर्णन केलेले आहे म्हणूनच प्रत्येकाने श्री संत मुक्ताबाई श्रीक्षेत्र महतनगर पंचक्रोशी परिक्रमेत सहभागी व्हावे. असे आवाहन ह भ प उद्धव महाराज जुनारे, व्यवस्थापक, यांनी केले आहे.