बोदवड बाजार समिती सभापती पदी सुधीर तराळ तर उपसभापती पदी ज्ञानेश्वर पाटील
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी | बोदवड कृषी उत्पन्न बाजार समिती वर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शेतकरी विकास पॅनल ने १८ पैकी १७ जागा जिंकून निर्विवाद यश प्राप्त केले होते. आज बाजार समिती चेअरमन, व्हाईस चेअरमन निवड प्रक्रिया पार पडली,यावेळी चेअरमनपदी अंतुर्ली येथिल सुधीर तराळ यांची तर व्हाईस चेअरमनपदी धोंनखेडा येथिल ज्ञानेश्वर पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शेतकरी पॅनलचे ईश्वर रहाणे, रामभाऊ पाटील, गणेश पाटील,योगेश पाटील, किशोर भंगाळे,अंकुश चौधरी, जिजाबाई कांडेलकर, आशाबाई टिकारे, विजय पाटील, दत्ता पाटील,माणकचंद अग्रवाल, अनिल चौधरी, गोपाळ माळी उपस्थित होते
यावेळी सर्वानुमते चेअरमन, व्हाईस चेअरमन यांची निवड करण्यात आली. निवडी नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून गुलाल उधळून जल्लोष केला
निवडी नंतर माजी महसुल मंत्री आमदार एकनाथराव खडसे, राष्ट्रवादी नेत्या रोहिणी ताई खडसे, विनोद तराळ यांनी चेअरमन सुधीर तराळ,व्हा चेअरमन ज्ञानेश्वर पाटील यांचा सत्कार केला.
यावेळी एकनाथराव खडसे म्हणाले गेल्या संचालक मंडळाने बाजार समिती प्रगती पथावर नेण्यासाठी प्रयत्न केले.नवनिर्वाचित संचालक मंडळ सुद्धा बाजार समिती प्रगतीवर ,भरभराटीस नेण्यासाठी प्रयत्न करतील अशी ग्वाही देतो. मुक्ताईनगर, बोदवड, भुसावळ अशा तीन तालुक्याचे या बाजार समितीचे कार्यक्षेत्र आहे
या तालुक्यातील शेतकरी बांधवांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर विश्वास टाकून शेतकरी विकास पॅनल च्या उमेदवारांना बहुमताने निवडणून दिले त्याबद्दल मि मतदारांचे आभार मानतो. या बाजार समितीला सहकाराचा मोठा वारसा आहे स्व. आ .हरिभाऊजी जवरे, स्व. प्रल्हादराव पाटील यांनी या बाजार समितीच्या हितासाठी कार्य केले
स्व. आ .हरिभाऊजी जवरे, स्व. प्रल्हादराव पाटील यांच्या स्मृती जपण्यासाठी येत्या वर्षभरात स्व. आ .हरिभाऊजी जवरे, स्व. प्रल्हादराव पाटील यांचा पुतळा उभारण्यात येईल अशी घोषणा एकनाथराव खडसे यांनी केली
बाजार समिती मध्ये पराभव दिसत असल्या कारणाने स्थानिक आमदार यांनी तीन तालुक्याचे कार्यक्षेत्र असलेल्या या बाजार समितीचे विभाजन करण्यासाठी प्रयत्न केला
निवडणूक स्थगित करण्यासाठी प्रयत्न केला परंतु जनतेला या बाबी पचनी पडल्या नाही जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बहुमताने निवडून दिले.आगामी काळात बाजार समिती मध्ये शेतकरी बांधवांना सुख सोयी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे एकनाथराव खडसे यांनी सांगितले.
यावेळी विधानसभा क्षेत्र प्रमुख विजय सोनार,तालुका अध्यक्ष आबा पाटील,रामदास पाटील, अनिल वराडे, भागवत टिकारे, बि सी महाजन,विलास धायडे, राजू माळी,प्रदिप बडगुजर, गोपाळ गंगतिरे,विजय चौधरी,प्रशांत भाल शंकर, विनोद कोळी,सुनिल पाटील,निलेश पाटील, सतीश पाटील, सुनिल पाटील,प्रविण कांडेलकर, विशाल रोटे,माधव पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते