भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

नगरपालिकामुक्ताईनगर

शिवसेनेच्या कामांना भाजपातील एका गटाचा पाठिंबा: मुक्ताईनगर नगरपंचायत मध्ये राजकारण–आरोप

Monday To Monday NewsNetwork।

मुक्ताईनगर प्रतिनिधी (अक्षय काठोके)। काही दिवसांपूर्वी मुक्ताईनगर शहरातील नगरपंचायत हद्दीतील असंख्य नागरिकांनी आ. चंद्रकांत पाटील यांच्याकडे त्या त्या प्रभागातील समस्या मांडल्या होत्या त्या समस्या सोडवण्यासाठी आ. चंद्रकांत पाटील यांनी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री महाराष्ट्र राज्य गुलाबराव पाटील यांच्याकडे सदरील कामे कामे करण्यासंदर्भात मागणी केली होती त्या मागणीनुसार मंत्री महोदयांनी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान या योजनेतून सदरच्या कामांना मंजुरी देऊन सदरील कामे करण्यासाठी निधी नगरपंचायत मुक्ताईनगर कडे वर्ग केले. परंतु सदरील कामे जर मुक्ताईनगर शहरामध्ये नगरपंचायत हद्दीत करायचे असल्यास सदरील कामांना नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी व ना हरकत लागत असते त्या अनुषंगाने आज दिनांक 24/ 5/ 2021 रोजी मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष नजमा तडवी यांनी सदरील कामांना नाहरकत व मंजुरी देण्यासाठी आज विशेष सभा बोलवली होती

परंतु सदरील सभेमध्ये सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी सदरील कामांना मंजुरी व ना हरकत देण्यात येऊ नये यासाठी मतदार संघाचा तत्कालीन विकास पुरुष म्हणून घेणारे तथाकथित यांनी सदरील नगरसेवकांवर दबाव आणून त्यांना या कामांना मंजुरी अथवा नाहरकत देऊ नका असा प्रचंड दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता असे आमच्या माहितीत आहे. परंतु सत्ताधारी पक्षातील 6 सुज्ञ नगरसेवक यांनी जनतेच्या समस्येची जाण ठेवली व सत्ताधारी भाजपाचे 6 व शिवसेनेच्या 3 नगरसेवकांनी अशा एकूण 9 नगरसेवकांनी सदरील कामांना मंजुरी व नाहरकत देण्यासाठी बहुमत दिले परंतु सत्ताधारी पक्षातील इतर 6 नगरसेवकांनी सदर कामांना विरोध करून मुक्ताईनगर शहरा बद्दल असलेल्या विकासाला खोडा घालण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे तसेच मतदारसंघाचे करते करवते विकासाचे महापुरुष म्हणणाऱ्या त्या व्यक्तीला आ. चंद्रकांत पाटील यांनी आणलेल्या पालकमंत्र्यांनी दिलेल्या कामे शहरात होऊ द्यायची नाही हा उद्देश त्यांचा असून त्यांचा करेक्ट कार्यक्रम यावेळेस सफशेल फोल ठरला आहे, यावरून असे सिद्ध होते की मुक्ताईनगर शहरवासीयांना विकास कामं पासून वंचित ठेवणे हेच त्यांचे विकासाबद्दल राजकारण आहे काय असा सवाल व आरोप शिवसेना गटनेते राजेंद्र हिवराळे यांनी केला असून सदरील माजी आमदार व त्यांचे समर्थक नगरसेवक विकास कामांना विरोध करून नागरिकांना मूलभूत सुविधांपासून पाप करीत असल्याचा आरोप केला आहे. तसेच आम्ही आ. चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्याने शहरात विकास कामे करण्यासाठी कटिबद्ध आहोत असे ही हिवराळे यांनी स्पष्ट केले. शिवसेनेचे गटनेते राजेंद्र हिवराळे यांनी आज शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेऊन सदर माहिती दिली पत्रकार परिषदेला आमदार चंद्रकांत पाटील यांचे स्वीय सहायक प्रवीण चौधरी, प्रशांत पाटील ,शिवसेना शहर संघटक वसंत भलभले ,नगरसेवक संतोष मराठे यांची उपस्थिती होती

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!