भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

नगरपालिकामुक्ताईनगर

Video : बक्षीस मिळालेली मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या कचरा विलीनीकरणांचा वाजतोय बोजवारा

मुक्तानगर, मंडे टू मंडे न्युज-अक्षय काठोके : नगरपंचायतीच्या शहरांमध्ये स्वच्छ भारत सुंदर भारत या मिशनच्या कचरा भरून नेणाऱ्या गाड्या प्रभाक वाईज फिरत असून या गाड्यांमध्ये एक गाणं वाजवत जात सुका कचरा ओला कचरा हा वेगवेगळा करून घंटागाडी मध्ये टाकावा परंतु कचऱ्याचे विलगीकरण डम्पिंग ग्राउंड होत नसल्याने नागरिकांनाच याप्रकरची सक्ती का ? असा प्रश्न सुज्ञ नागरिकांना पडलेला आहे

नगर पंचायत नागरिकांकडून ओला कचरा व सुका कचरा याची विलगीकरण करत आहे. परंतु, या कचऱ्याचे डम्पिंग ग्राउंडला जाऊन ओला कचरा सुका कचरा प्लास्टिक असो लोखंड असो असा कुठलाही प्रकारचा डम्पिंग ग्राउंडला विलगीकरण होताना दिसून येत नसल्याने घंटागाडीमध्ये विलगीकरणाचा आग्रह का ? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे. या विलगीकरणातून नगरपंचायतीला जो फायदा होणार आहे तो फायदा होताना दिसून येत नाही. या कचऱ्यामध्ये शेतासाठी लागणारे खत तयार होत असते, प्लास्टिक वेगळे निघाले म्हणजे प्लास्टिक पासून पैसा निर्माण होत असतो. भंगार लोखंड यापासून सुद्धा नगरपंचायतीला पैसा उपलब्ध होऊ शकतो. परंतु, असा कुठल्याही प्रकारचा उत्पन्न नगरपंचायतीला याबाबत होताना दिसून येत नाही. लाखो रुपयाचे नुकसान नगरपंचायत यामध्ये करताना दिसून येत आहे. मागील काही वर्षांमध्ये नगरपंचायतीने स्वच्छ भारत सुंदर भारत या संदर्भात ७५ लाख रुपये हे बक्षीस  मिळविले. परंतु, हे बक्षीस का फक्त कागदोपत्री होते असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. बहुतांश ओला कचरा अथवा सुका कचरा हा जवळच असलेल्या स्मशानभूमीच्य खड्ड्यामध्ये कोंबण्यात आलेला आहे तो कचरा त्या खड्ड्यामध्ये का कोंबण्यात आला याबाबतही नागरिक प्रश्न उपस्थित करत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!