अखेर त्या धोकादायक गतिरोधकवर “मंडे टू मंडे न्युज”च्या पुढाकाराने दिशादर्शक पट्टे मारण्याचे काम सुरू !
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज-अक्षय काठोके : येथील रस्त्यावरती गतिरोधकावर दिशादर्शक पट्टे नसल्यामुळे अपघाताच्या घटना घडत होत्या याबाबत “मंडे टू मंडे न्यूज” ने सार्वजनिक बांधकाम विभागाला माहिती दिली असता त्याची तात्काळ दखल घेऊन आज गतिरोधकावरती दिशादर्शक पांढरे पट्टे मारण्याचे काम हाती घेण्यात आलेले आहे.
भुसावळ रोड येथील आनंद ट्रेडर्स समोरील रस्त्यावरती गतिरोधकावर दिशादर्शक पट्टे नसल्यामुळे गाड्या त्यावरती उधळून अपघाताची मालिका सुरू होती. याबाबत मुक्ताईनगर येथील रहिवासी अमरदीप पाटील यांनी “मंडे टू मंडे न्यूज”चे प्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधून याबाबत व्यथा मांडली व यात पुढाकार घेऊन लक्ष देण्याची विनंती केली त्यामुळे तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सच्चिदानंद शेजवळ यांच्याशी संपर्क साधून मंडे टू मंडे न्युज ने यासंदर्भात माहिती दिली.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्याची तात्काळ दखल घेत आज गतिरोधकावरती दिशादर्शक पांढरे पट्टे मारण्याचे काम हाती घेण्यात आलेले आहे तसेच इतर गतिरोधकांवर सुद्धा पट्टे मारण्याचे काम सुरू आहे यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सच्चिदानंद शेजवळ व कर्मचारी उपस्थित होते. मुक्ताईनगर वासीयांनी “मंडे टू मंडे न्युज” चे आभार मानले आहे.