Video : शिवसेनेच्या तीन पदाधिकाऱ्यांकडून पिस्तुल, तलवार व रॉडने माझ्यावर हल्ला– रोहिणी खडसेच्या आरोपने खळबळ !
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : बोदवड निवडणुकीच्या सेना राष्ट्रवादी वादानंतर या सर्व प्रकारांना सुरवात झाली असून आम्ही अवैध धंद्यांचे निवेदन दिले माज्या महिला पदाधिकाऱ्यांना धमकी व विनयभंगाचा प्रयत्न केला गेला या सर्व घटनांची किनार या जीवघेण्या हल्ल्या मागे असून काल माझ्या कारला ३ दुचाक्या आडव्या लावून रॉड , तलवार आणि पिस्तुलाचा धाक दाखवत रॉडने कारची तोडफोड करणारे ‘ ते ‘ ३ हल्लेखोर शिवसेनेचे पदाधिकारी आहेत असा गंभीर आरोप रोहिणी खडसे यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
रोहिणी खडसे – खेवलकर यांनी सांगितले की , ३ दुचाक्या घेऊन ७ लोक आले होते त्यापैकी तिघांच्या हातात अनुक्रमे रॉड , तलवार आणि पिस्तुल होते . एकाने मी कारमध्ये बसलेल्या बाजूने माझ्यावर पिस्तूल रोखले व कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र दरवाजा उघडला नाही म्हणून हातात रॉड असलेल्या व्यक्तीने काचेवर जोराने हल्ला चढविला, अशा शब्दात जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणीताई खडसे (Rohini Khadse) यांनी आपल्यावरील हल्ल्याची थरारक कहाणी पत्रकारांना आज सांगितली.
जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणीताई खडसे यांच्यावरील हल्ल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. आज सकाळी रोहिणीताई खडसे यांनी आपल्यावरील हल्ल्याची माहिती पत्रकारांना दिली. त्या म्हणाल्या की, मी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास मानेगाववरून मुक्ताईनगरकडे येत असताना (एमएच १९ सीसी-१९१९) या क्रमांकाच्या त्यांच्या कारवर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. यावेळी कारमध्ये यावेळी त्यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक पांडुरंग नाफडे आणि गाडीचा चालक होता. अचानक तीन दुचाकीवरून सात जण आले होते. यातील तिघे शिवसेनेचे पदाधिकारी होते. एकाच्या हातात पिस्तूल, एकाच्या हातात तलवार तर तिसऱ्याच्या हातात लोखंडी रॉड होता. त्यातील एकाने मी कारमध्ये बसलेल्या बाजूने माझ्यावर पिस्तूल रोखले व कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र दरवाजा उघडला नाही म्हणून हातात रॉड असलेल्या व्यक्तीने काचेवर जोराने हल्ला चढविला, असं त्या म्हणाल्या. ‘मला मारण्यासाठीच हे तिघेजण आले होते. हा हल्ला मला घाबरविण्यासाठी होता. मात्र मी घाबरणारी नाही. दरम्यान, बोदवड नगरपंचायतीपासून सुरू झालेल्या वादातून शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी हा हल्ला केला आहे, असा थेट आरोप त्यांनी केला. दरम्यान, या हल्ल्यात सुदैवाने मला कसलीही दुखापत झालेली नाही. परंतू हल्ला केल्यानंतर काही क्षणातच हल्लेखोर फरार झाल्याचेही रोहिणीताई खडसे यांनी सांगीतले.