मुक्ताईनगर जवळ झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार तर चार जण जखमी
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्यूज प्रतिनिधी। मुक्ताईनगर येथून पूर्णाड गावी परतत असताना स्मशानभूमी जवळ रोहित मुकेश गाढे आणि प्रदीप छगन वाघ यांचा समोरून येणाऱ्या कमलेश सुभाष पाटोळे, लिलाबाई सुभाष पाटोळे, मनीषा सुभाष पाटोळे यांच्या गाडीला समोरासमोर धडक होऊन गंभीर अपघात झाला त्यातच मागून येणाऱ्या दोन दुचाकी सुद्धा या पुढील गाड्यांवर आदळल्या . या अपघातात रोहित मुकेश गाढे वय १९ वर्ष, प्रदीप छगन वाघ वय २८ वर्ष दोघे रा. पूर्णाड असे दोघे मयत झालेले असून कमलेश सुभाष पाटोळे मनीषा सुभाष पाटोळे लिलाबाई सुभाष पाटोळे रा. चांगदेव व अशोक गंगाराम सावळे रा.पातोंडी तालुका रावेर हे गंभीर जखमी झाले.
या अपघाताची माहिती मिळताच मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील व राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष ऍड. रोहिणीताई खडसे यांनी मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालय गाठून जखमी रुग्णाची भेट घेत जखमींना प्रथमोपचार करून तात्काळ जळगाव जिल्हा रुग्णालय येथे पुढील उपचारासाठी रवाना केले
अपघाताची माहिती मिळताच नातेवाईक व नागरिकांनी मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली, मुक्ताईनगर चे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते व पोलीस कर्मचाऱ्यांनी परिस्थिती आटोक्यात आणली. अधिक चौकशी की असता , अपघातातील मयत दोघे पूर्णाड येथील रहिवासी असून या आधी पूर्णाड गावातीलच एकाने आत्महत्या केल्यामुळे त्याला बघायलाच हे दोघे मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात गेले होते आणि अपघातात दोघांचा मृत्यू झाला एकाच गावातील तिघे असल्यामुळे पूर्णाड गावावर शोककळा पसरली आहे