पत्रकार दिनानिमीत्त मुक्ताईनगर शहरात लसीकरण शिबिर संपन्न
मुक्ताईनगर, प्रतिनिधी : मुक्ताईनगर तालुका पत्रकार संघटनेतर्फे मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौकात पत्रकार दिनाचे औचित्य साधत 15 ते 18 व त्यावरील सर्वच वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरणाचे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिराचे उद्घाटन वैद्यकीय उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर योगेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी तहसीलदार श्वेता संचेती, तालुका वैद्यकीय प्रभारी अधिकारी डॉक्टर देशमुख, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉक्टर जगदीश पाटील, संत मुक्ताई संस्थानचे उद्धव जुनारे महाराज, स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष डॉक्टर विवेक सोनवणे, शिवसेनेचे गटनेते राजेंद्र हिवराळे , तालुका वैद्यकीय कार्यालयातील अर्जुन काळे, व्ही एस पाटील, प्रदीप काळे, ज्योती खरे, रितेश गवई, ॲड राहुल पाटील, गणेश टाँगे, विशाल पाटील,हर्षाली महाजन,निलेश भालेराव हे प्रमुख मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी महामानावांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात येऊन व हित कापून कार्यक्रमाचे उद्घाटन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर योगेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.
11 वाजेपर्यंत जवळपास शंभर नागरिकांच्या वर लसीकरण झाले होते. याप्रसंगी पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष शरद बोदडे उपाध्यक्ष विनायक वाडेकर सचिव संदीप जोगी स्टार पत्रकार मतीन शेख मोहन मेढे आतिक खान ,प्रमोद सौंदळे, पंकज कपले, अक्षय काठोके, पंकज तायडे, विठ्ठल धनगर,नगरसेवक संतोष मराठे ,राजेश चौधरी, राजेश पाटील, एम के पाटील, दीपक चौधरी, नितीन कासार ,मुकेश महल्ले, सतीश गायकवाड, देवेंद्र काटे,अमोल वैद्य, रवी गोरे,संजय वाडीले, प्रविन भोई, छबिलदास पाटील, याप्रसंगी स्टार पत्रकार म्हणून निवड झाल्याबद्दल मतीन शेख व विनायक वाडेकर यांचा गौरव करण्यात आला.