मुक्ताईनगर

ग्रामसेवकांच्या हलगर्जीपणामुळे पोकरा योजनेच्या अनुदानापासून शेतकरी वंचित : अॅड.रोहिणी खडसेंच्या पाठपुराव्याने प्रश्न मार्गी !

मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।

मुक्ताईनगर, प्रतिनिधी : राज्यात पोकरा योजने अंतर्गत शेतकऱ्यांना ठिबक संचात अनुदान मिळते मात्र तालुक्यातील शेतकऱ्यांना ग्रामसेवकांच्या हलगर्जी पणामुळे अनुदानापासून वंचित राहावे लागत होते. यासंदर्भात अॅड. रोहिणी खडसे यांनी तातडीची बैठक घेत शेकऱ्यांचा अनुदानाचा प्रश्न मार्गी लावला आहे.

याबाबत सविस्तर असे, माजी कृषी मंत्री एकनाथरावजी खडसे हे मंत्री असताना त्यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (पोकरा) मध्ये जळगाव जिल्हयाचा समावेश केला आहे, या योजने अंतर्गत समाविष्ट गावातील शेतकरी बांधवांना अनुदानावर ठिबक संच मिळतो, परंतु शासनाचे निर्देश असताना सुद्धा काही ग्रामसेवक ग्रामसभा घेत नसल्या कारणाने व काही तांत्रिक बाबीमुळे मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकरी बांधवांना पोकरा अंतर्गत मिळणाऱ्या अनुदाना पासून वंचित राहावे लागत होते काही शेतकरी बांधवांनी हि बाब जे डी सी सी बँकेच्या चेअरमन रोहिणी ताई खडसे खेवलकर यांच्या लक्षात आणून दिली यावर रोहिणी खडसे खेवलकर यांनी गटविकास अधिकारी श्री नागटिळक, विस्तार अधिकारी आर एल जैन यांच्या सोबत ग्रामसेवक यांना ग्रामसभा घ्यायला लावून व काही तांत्रिक अडचणी असतील तर त्या सोडविण्यात येऊन शेतकरी वर्गाला पोकरा अंतर्गत ठिबक संचावर अनुदान मिळण्यासाठीचा मार्ग मोकळा करावा असे चर्चे अंतर्गत सूचित केले यावर गटविकास अधिकारी नागटिळक यांनी ग्रामसेवकांना त्वरित सुचना करून मार्ग काढतो व कर्तव्यात कसूर करणाऱ्यावर कारवाई करतो असे अश्वस्त केले, याप्रसंगी प स सभापती सुवर्णाताई साळुंखे, प स सदस्य राजेंद्र सवळे, चंद्रकांत भोलाने, विनोद पाटील , माजी प स सभापती दशरथ कांडेलकर, विधानसभा क्षेत्र प्रमुख विजय सोनार, प्रदिप साळुंखे,सुनिल काटे, अरुण गायकवाड उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!