”हा कुठला शिवसेनेचा आमदार हा तर अपक्ष आमदार, राष्ट्रवादीच्या पाठींब्याने निवडून आला– एकनाथ खडसेंचा हल्लाबोल
मुक्ताईनगर प्रतिनिधी : ” अवैध धंदे तक्रार दिल्याने काल रोहिणी खडसे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला अशा हल्ल्यांमुळे आम्ही घाबरणारे नसून महिलांच्या सन्मानासाठी आमचा लढा सुरू आहे” मतदारसंघातील महिला तक्रार देण्यास घाबरत असून या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास महिलांवरील अत्याचाराची अनेक प्रकरणे बाहेर येतील. त्या ऑडिओ क्लीप्समध्ये महिलांबाबतचे अनेक अश्लील संदर्भ असून ते तपासावे अशी मागणी आज माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केली असून ”हा कुठला शिवसेनेचा आमदार….हा तर अपक्ष आमदार, रविंद्र भैय्यांनी तिकीट नाकारल्याने राष्ट्रवादीच्या पाठींब्याने निवडून आला, आणि आज निवडून देणार्यांवरच उलटला” असे म्हणत त्यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर हल्लाबोल करत जोरदार टीकास्त्र सोडले.
राष्ट्रवादीच्या नेत्या व जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्याकारवकाल सोमवारी जीवघेणा हल्ला करण्यात आला. यात शिवसेनेचे कार्यकर्ते असल्याचा आरोप रोहिणी खडसे यांनी सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत केला. त्यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी हल्ल्याचा तीव्र निषेध करत आमदार चंद्रकांत पाटलांवर हल्लाबोल केला. यावेळी माजी मंत्री एकनाथ खडसे म्हणाले की, चंद्रकांत पाटील हा शिवसेनेचा आमदार नाही. हा अपक्ष आमदार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील यांच्यामुळे निवडून आलेला आमदार आहे. एकीकडे शिवसेनेचा जिल्हाप्रमुख म्हणवतो आणि दुसरीकडे अपक्ष आमदार असल्याचे सांगता. युतीची गद्दारी करून निवडून आलेला हा आमदार आहे. यापुर्वीची पार्श्वभूमीची चौकशी करावी, एका महिलेवर आणि मुलीवर अत्याचार केला असल्याची माहिती सांगत. या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास महिलांवरील अत्याचाराची अनेक प्रकरणे बाहेर येतील. यातील ऑडिओ क्लीप्समध्ये महिलांबाबतचे अनेक अश्लील संदर्भ आहेत. माजी मंत्री खडसे पुढे म्हणाले की, गुंड प्रवृत्तीचे लोक असल्याने यापुर्वी मी देखील अनेक भाषणांमध्ये गुंडप्रवृत्तीच्या लोकांवर आळा घालण्याबाबत सांगितले होते. गुंडागर्दी वाढेल, अवैध धंदे वाढतील, महिलाचे छेडछानीचे प्रकार वाढतील असे प्रत्येक भाषणात सांगत होते. आता नेमकं तेच घडत असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व घडामोडीनंतर एकंदरीत पाटील खडसे वाद वेगळ्या वळणावर आल्याचे पाहायला मिळत आहे.