भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगरसामाजिक

संकटांना, दुखांना दुर करण्यासाठी शक्तीची उपासना हा सर्वोत्तम मार्ग – ॲड. रोहिणी खडसे

मुक्ताईनगर,मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी। नवरात्र उत्सवात सर्वत्र आदिशक्ती म्हणजे शक्तीचे स्वरूप असलेल्या दुर्गा मातेची उपासना केली जाते म्हणून नवरात्रीला शक्तिदेवतेचा उत्सव म्हटले जाते नवरात्रात शक्तीची निरनिराळी रूपे आपल्याकडे परंपरेने पुजली जातात. दुर्गा देवीच्या उपासना, आराधना, नामस्मरण, जप केले जातात. नवरात्रात केलेले दुर्गा देवीचे पूजन सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. नवरात्राच्या संपूर्ण नऊ दिवसात नवदुर्गेच्या नऊ रुपांचे पूजन केले जाते. अनेक ठिकाणी आपापाले कुळाचार, कुळधर्म, प्रथा, पद्धती, परंपरा यांनुसार विशेष व्रताचरण केले जाते.


देवीच्या विविध श्लोक, मंत्र, पाठ यांमध्ये श्रीदुर्गा सप्तशती पाठला विशेष शुभ पुण्यफलदायक मानले गेले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष ॲड रोहिणी खडसे यांच्या तर्फे नवरात्री आणि आदिशक्ती मुक्ताई च्या 744 व्या जन्म उत्सव सोहळ्याचे औचित्य साधुन श्री संत गजानन महाराज मंदिर मुक्ताईनगर येथे श्री दुर्गा सप्तशती पाठाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी तिनशे महिला भगिनींनी या उपक्रमात सहभागी होऊन दुर्गा सप्तशती पाठाचे पठण केले.दुर्गा सप्तशती पाठाच्या मंत्रोपचाराच्या पठणाने परीसरातील वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते.


सहभागी झालेल्या महिलांना ॲड. रोहिणी खडसे यांच्या तर्फे दुर्गा सप्तशती पाठ पुस्तकाचे वितरण करण्यात आले
यावेळी ॲड रोहिणी खडसे म्हणाल्या आपल्या कडे शक्तीला आणि शक्ती उपासनेला अनन्यसाधारण महत्व आहे.
आपल्या जीवनात येणाऱ्या संकटांना, दुखांना दूर करण्यासाठी शक्तीची उपासना हा सर्वोत्तम मार्ग सांगितल्या जातो. आणि नवरात्रात देवीचा शक्ती स्वरुपात सर्वत्र मुक्त संचार असल्याचे मानले जाते म्हणुन यावेळी देवीची म्हणजे शक्तीची उपासना केली जाते दुर्गा सप्तशती पाठ म्हणजे देवीच्या शक्ती स्वरुपाची केलेली उपासनाच होय
आपले धर्मग्रंथ हेच आपल्या आध्यात्मिक उन्नतीचे साधन आहे आणि असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही, त्यातून आपल्याला शांती, सुसंवाद आणि आत्मज्ञान प्राप्त होण्यास मदत होते.बनकारात्मक शक्ती दुर होऊन आणि जीवनातील अडथळ्यांसोबत लढण्यासाठी शक्ती प्राप्त होते आज दुर्गा सप्तशती पाठाचे पठण करून आदिशक्ती दुर्गा माता आणि मुक्ताईला नारीशक्तीला अन्याया, अत्याचाराविरोधात लढण्याचे बळ दे आणि सर्वांना सुख समृद्धी निरोगी दीर्घायुष्य मिळू दे अशी प्रार्थना केल्याचे ॲड रोहिणी खडसे यांनी सांगीतले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!