ओबीसीच्या राजकीय आरक्षणासाठी ओबीसी व्हीजेएनटी मोर्चा तर्फे उद्या मुक्ताईनगरात रास्ता रोको
मुक्ताईनगर प्रतिनिधी : ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी आरक्षण पूर्ववत होईपर्यंत महाराष्ट्रातील होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका थांबविण्यात याव्या या मागणीसाठी ओबीसी व्हीजेएनटी मोर्चा तर्फे उद्या मुक्ताईनगरात रास्ता रोको करण्यात येणार आहे.
अधिक माहिती अशी, OBC समाज्याच्या राजकीय आरक्षण रद्द करण्यात आले आहे त्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पूर्ववत होईपर्यंत महाराष्ट्रातील होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका थांबविण्यात याव्या या मागणीसाठी उद्या दिनांक17/12/2021 रोजी ओबीसी व्हिजेनटी जनमोर्चा तर्फे मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकात सकाळी 11 वाजता रास्ता रोको करण्यात येणार आहेत याबाबत आज मुक्ताईनगर पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले निवेदन देताना तालुकाध्यक्ष देवानंद वंजारी, शहराध्यक्ष योगेश काळे, दीपक नाईक ,कैलास वंजारी ,प्रदीप काळे, बाळा चिंचोले, प्रफुल बावणे ,अक्षय बावणे, सनी वंजारी आदी उपस्थित होते.