धाब्यावर केमिकलचे नमुने घेण्यासाठी ५ महिन्यापासून अधिकारी येईना ! गोडबंगाल काय ?
मुक्ताईनगर प्रतिनिधी, अक्षय काठोके | शहरातील पत्रकारांना 16 एप्रिल 2023 रोजी घोडसगाव -चिखली शिवारातील धाब्यावर अवैधरीत्या बायोडिझेल व केमिकल उतरविले जात असून त्याचा साठा केला जातो त्याची माहिती मिळाल्यानंतर पत्रकारांनी सदरील धाब्यावर जाऊन पाहणी केली असता तिथे एक बायोडिझेलचे टँकर उभे होते त्यानंतर मुक्ताईनगर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना फोन केला असता कोणीही प्रतिसाद दिला नाही त्यामुळे पत्रकारांनी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांना रात्री 9 वाजेला सदर घटनेबाबत माहिती दिली असता त्यांनी तत्काळ स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना माहिती दिली त्यांनी तत्काळ डीवायएसपी शिकारे यांना कळवून त्यांनी एक पथक व मुक्ताईनगर पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले तेव्हा त्या ठिकाणी 8 ते 10 टाक्या केमिकल व बायोडिझेल यांनी भरलेल्या दिसून आल्या पोलिसांनी रात्री 2 वाजेपर्यंत कारवाई करून मारून फक्त कागदाचे सील त्यावर लावण्यात आले
आधीच पोलीस प्रशासनामार्फत कारवाई होईना आणि झाल्यास केमिकल तपासण्यासाठी ५ महिन्यापासून प्रशासन येईना– पत्रकारांनी केमिकल व बायोडिझेल पकडले असता स्थानिक पोलीस प्रशासन कॉल रिसिव्ह करत नसल्यामुळे पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांना कॉल करून या घटना संदर्भात सांगितले असता त्यांनी लागलीच स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसन नजन पाटील यांना यासंदर्भात माहिती दिली असता त्यांनी तत्काळ मुक्ताईनगर येथे पथक नेमून घटनास्थळी पाठवले थातूरमातूर कारवाई रात्रीच्या 2 वाजेपर्यंत चालली. फक्त त्या ठिकाणी त्या दहा ते बारा ड्रमला कागदाचे सील लावण्यात आले असून ही कारवाई आतापर्यंत चालली अशा प्रकारची फिर हेराफेरी मुक्ताईनगर शहरांमध्ये प्रशासनाकडून होत आहे या संबंधित अधिकारी म्हणतात, हे आमचे काम नाही तर पुरवठा विभागाचे आहे तर पोलीस प्रशासन त्या ठिकाणी का गेले ? व पोलीस प्रशासनाने कारवाई का केली? तर पोलीस प्रशासन सांगतात की आम्ही हे काम पुरवठा विभागाकडे पत्रव्यवहार करून सांगितले आहे या संदर्भात पुरवठा विभागच सांगेल पुरवठा विभाग औरंगाबाद वरून किंवा मुंबईवरून एक पथक येत आहे तपासणीसाठी यामध्ये टेक्निकल व्यक्ती लागतो त्यावर आम्हाला याची कुठलीही कल्पना नाही तर ऑइल कंपन्यांचे टेक्निकल येतील तेव्हाच हे केमिकल काय आहे ते कळेल नेमक यामध्ये मुक्ताईनगर प्रशासन व मुक्ताईनगर शहरांमध्ये हॉटेलवर उतरणारे केमिकल यामध्ये काही गौड बंगाल आहे का? असा गंभीर प्रश्न मुक्ताईनगर वासियांना पडला आहे
पोलिसांचे आता पुरवठा विभागाकडे बोट?
प्रशासनास एकमेकांवर बोट ठेवत दिशाभूल करण्याचा प्रयत्न नागरिकांसोबत केला जात आहे. पोलीस प्रशासन म्हणतात की, आम्ही कारवाई केलेली आहे. परंतु केमिकल तपासण्याचे काम पुरवठा विभाग यांच्याकडे लाखों आहे . पत्रकारांनी पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यावर आम्ही पुरवठा विभागाशी संपर्क केलेला आहे. नमुने घेण्यासाठी ते येतील, असे सांगण्यात आले. तसेच पुरवठा अधिकारी गावडे यांच्याशी संपर्क केला. तेव्हा आम्ही वारंवार पत्रव्यवहार ई – मेल पाठविले आहे. छत्रपती संभाजीनगर येथील अधिकारी येणार आहे, असे सांगण्यात आल्यानंतर ऑइल कंपन्यांचे केमिकल तपासणारे अधिकारी मुंबईवरून येणार आहे, असे सांगण्यात आले. परंतु गेल्या पाच महिन्यापासून अधिकारी काही नमुने घेण्यासाठी येईना, अशी स्थिती निर्माण झाली आहे. यामधील काळाबाजार नागरिकांना समजेल असा झालेला आहे. अधिकारी नमुने घेण्यासाठी न येण्याचे कारण काय ? केमिकल निकामी होण्याची तर वाट पाहिली जात नाही ना ? असेही नागरिकांमधून चर्चिले जात आहे.
अर्थपूर्ण संबंधातून तर पोलीस अधिकाऱ्यांची घटनास्थळी येण्यासाठी टाळाटाळ ?
घोडसगाव- चिखली शिवारातील काही ढावे व हॉटेलवर गांजा, नशेचे पदार्थ, केमिकल, कच्चे तेल, फनांस, बायोडिझेल, ट्रकमपील डिझेल चोरीचा माल काळाबाजार करून दररोज लाखोंची उलाढाल होत असते. परंतु यावर कारवाई न होण्यामागचे कारण काय ? अर्थपूर्ण संबंधातून पोलीस अधिकाऱ्यांची घटनास्थळी येण्यासाठी टाळाटाळ का करत आहे ? असे एक ना अनेक प्रश्न सुज्ञ नागरिकांमधून उपस्थित होत आहे. आता या प्रकरणावर जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार काय भूमिका घेतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.