अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांना फोन : तातडीने रवाना
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज अक्षय काठोके : मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील सकाळी मुंबईहून मुक्ताईनगर त्यांच्या घरी दाखल झाले होते मात्र, अचानक चंद्रकांत पाटील यांना एक फोन आल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते त्यामुळे तातडीने रवाना झाले आहे. मुंबईकडे गेले की गुवाहाटी कडे याबाबत माहिती मिळाली नाही मात्र, प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले जे चाललंय तिकडेच असे त्यांच्या कडून सांगण्यात आले.
शिवसेनेने आमदार एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने शिवसेनेत मोठी खळबळ उडाली आहे. शिंदेंकडून 46 आमदार असल्याचा दावा करण्यात येत आहे यादरम्यान मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील सकाळी मुंबईहून मुक्ताईनगरमध्ये दाखल झाले दरम्यान, आ.चंद्रकांत पाटील यांना नेमका फोन कुणाचा आला. ते एकनाथ शिंदे गटात कडे गेले की मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे गेले याबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही. सकाळ त्यांच्याशी संवाद साधला असता आपली पुढील भूमिका काय यावर त्यांनी सांगितले, जे चालू आहे त्यांच्याकडे असे सांगत संकेत तर दिले नाही असा कयास लावला जात आहे.
एकनाथ शिंदे समर्थक मोठ्या संख्येनं आमदार घेऊन गुवाहाटीमध्ये गेले आहेत. आता गुलाबराव पाटील नॅटरिचेबल असल्यानं हे शिंदेंच्या गटात तर गेले नाहीत ना, असाही प्रश्न सध्या चर्चेत आहे. अनेक जणांनी मानधरणी करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून अयशस्वी ठरला. एकनाथ शिंदे हे आपल्या निर्णयावर ठाम आहे.