मुक्ताईनगर पोलिसांचे अवैध गावठी दारूवर छापे : २ हातभट्टी उद्धवस्त !
मुक्ताईनगर, प्रतिनिधी : तालुक्यातील अवैध धंद्यांवर गेल्या महिन्यांपासून कारवाई करण्यात येत असून मुक्ताईनगर पोलिसांनी दोन गावठी दारुच्या हातभट्टी वरती छापा टाकला कारवाई केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांचे मार्गदर्शनाखाली मुक्ताईनगर पोलिस कर्मचाऱ्यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील दोन ठिकाणी गावठी दारु वर छापा टाकला यामध्ये पहिली कारवाई इच्छापुर येथील पत्र्याच्या शेडमध्ये करण्यात आली आरोपीकडून 15700 रुपये किमतीचे कच्चे-पक्के रसायन व गावठी दारू तयार करण्यास लागणारे साहित्य हस्तगत करण्यात आले पोलीस कॉन्स्टेबल सागर राजू सावे यांच्या फिर्यादीवरून आरोपी परशुराम सखाराम बेलदार विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 (ई)65(क)ब क प्रमाणे कारवाई करण्यात आली कारवाई पथकात पोलीस हेडकॉन्स्टेबल शैलेश चव्हाण, पोलीस नाईक प्रदीप इंगळे ,रवींद्र मेढे,माधव गोरेवार ,अंकुश बाविस्कर, सुरेश पाटील (चालक )यांचा समावेश होता
दुसरी कारवाई इच्छापुर निमखेडी गावी जुनी पाणी सप्लायर विहिरिजवळ करण्यात आली यावेळी आरोपीकडून 6500 रुपये किमतीचे गुळ मोह मिश्रित कच्चे-पक्के रसायन व गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यास लागणारे साहित्य हस्तगत करण्यात आले पोलीस कॉन्स्टेबल राहुल काशिनाथ नावकर यांच्या फिर्यादीवरून आरोपी विलास महादेव कोळी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 क,ब,क प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला यावेळी पथकात शैलेश चव्हाण, प्रदीप इंगळे ,हरीश गवळी, रवींद्र मेढे,माधव गोरेवार, अंकुश बाविस्कर ,सागर सावे यांचा समावेश होता पोलिसांच्या धडक कारवाईमुळे अवैद्य धंदे चालकांच्या गोटात खळबळ उडाली आहे.