अवैध सावकारी प्रकरणात सहकारच्या आठ ठिकाणी धाडी !
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्यूज प्रतिनिधी : अवैध सावकारीच्या विरोधात सहकार खात्याच्या पथकाने मुक्ताईनगर आणि बोदवड तालुक्यात छापेमारी करून कागदपत्रे जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. असून एकूण सहा ते आठ ठिकाणी हे छापेमारी करण्यात आलेली आहे.
- धक्कादायक : यावल तालुक्यातील सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार
- …तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट ; पुन्हा राज्यात २०१९ ची परिस्थिती
- SSC & HSC Exam : १० वी १२ वी च्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
अवैध सावकारी प्रकरणात सहकार खात्याच्या पथकाने शुक्रवारी दिवसभर मुक्ताईनगर आणि बोदवड तालुक्यात छापेमारी केली. शुक्रवारी सकाळी साडेनऊ पासून सुरू झालेली ही कारवाई सायंकाळपर्यंत चालूच होती. यात पथकाने अवैध सावकारी संबंधातील काही महत्वाची दस्ताऐवज मिळाल्याची माहिती मिळाली आहे.
या कारवाईच्या अंतर्गत मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्हा काकोडा येथील संदीपकुमार शामसुंदर खंडेलवाल, राजकुमार रामकुमार खंडेलवाल, बळीराम चांगो महाजन, प्रतीक रामनिवास खंडेलवाल, आणि हरी किसन भोई व सालबर्डी येथील प्रदीप बढे व बोदवड येथील वसंत खाचणे आणि कैलास गोपीचंद अहुजा यांच्याकडे ही छापेमारी करण्यात आली आहे. एकूण आठ ठिकाणी छापेमारी करण्यात आली.या पथकात सहकार खात्याच्या अधिकार्यांचा समावेश होता.
जिल्हा उपनिबंधक बिडवई व तालुका निबंधक मंगेश कुमार शाह यांच्या नेतृत्वाखाली पाच पथकांनी या धाडी टाकल्या आहार. या पथकात चोपडा येथील एस.एफ. गायकवाड, जामनेरचेजे.बी. बारी, अमळनेरचे के.पी. पाटील, एरंडोलचे जी.एच. पाटील मुक्ताईनगरचे मंगेशकुमार शहा, भडगावचे महेश कासार, चाळीसगावचे चंद्रकांत पवार आणि एन.के. सूर्यवंशी पाचोरा या अधिकार्यांचा समावेश होता. या छाप्यातून महत्वाचे पुरावे हाती लागल्याची समजत असून यावरून आता नेमकी काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. छापेमारी करताना मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला होता.