मुक्ताईनगर

सणा सुदीत रेशन लाभार्थी धान्यापासून वंचित; शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधी :  येथील पुरवठा विभागाच्या भोंगळ कारभाराने दसरा व दिवाळी सणाच्या काळात गोरगरीब रेशन धान्यापासून वंचित राहत असल्याने आज आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार यांना शिवसेनेतर्फे निवेदन देऊन ही आंदोलन करण्यात आले. तसेच 24 तासात धान्य वाटप न झाल्यास तहसीलदार यांच्या दालनासमोर उग्र स्वरूपाचे आंदोलन शिवसेना स्टाईलने करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

मुक्ताईनगर तालुका पुरवठा विभागाचा अतिशय भोंगळ कारभार सुरू असून शहरातील सहा स्वस्त धान्य दुकानांवर पुरवठा वाहतूक कंत्राटदार व पुरवठा अधिकारी तसेच कर्मचारी यांचे अर्थपूर्ण साठे लुटे असल्याने गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून धान्य पोहोचले नाही त्यातच नवरात्री सारखा मोठा सण आहे व  हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचा सण म्हणजे दसरा येऊन ठेपला आहे तसेच काही दिवसांनी दिवाळी आहे परंतु महत्त्वाचे सण असताना देखील अद्याप पर्यंत धान्य दुकानांवर धान्य पुरवठा केला जात नाही.

जिल्हाभरात धान्य उपलब्ध असताना पुरवठा विभागातील गलथन कारभारामुळे अन्नसुरक्षा योजनेतील गोरगरीब नागरिक हक्काच्या धान्यापासून वंचित राहत आहे तसेच सणासुदीच्या काळात नागरिकांना छेडण्याचा हा मोठा प्रकार थांबवण्यात यावा याकरिता आज निवेदन देऊन आंदोलन ही करण्यात आले तसेच 24 तासात धान्य वाटप सुरू न केल्यास तहसीलदार कार्यालय येथे मोठ्या स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख छोटू भोई, उपतालुकाप्रमुख प्रफुल पाटील अल्पसंख्यांक जिल्हा संघटक अफसर खान शहर प्रमुख गणेश टोंगे, राजेंद्र हिवराडे गोपाळ सोनवणे संतोष मराठे संतोष माळी शकुर जमादार, मुशीर मनियार, शकील मेंबर, साजिद खान, अनिकेत भोई, पिंटू पाटील, अवि अडकमोल सहअसंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!