नवाब मलिक यांच्या विरोधात केंद्रीय यंत्रणेचा सूडबुद्धीने वापर,केंद्र शासनाचा राष्ट्रवादी कांग्रेस कडून निषेध
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे वृत्तसेवा। आज दिनांक 25 फेब्रुवारी 2022 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी, मुक्ताईनगर यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात असे म्हटले आहे की, ना. नवाब मलिक ( अल्पसंख्याक मंत्री, महाराष्ट्र राज्य ) यांना ई.डी. ने कुठलीही नोटीस न देता चौकशीला बोलाविले आणि खोटे आरोप त्यांच्यावर करण्यात आले तसेच केंद्रातील भाजप सरकार महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केंद्रीय यंत्रणेचा सूडबुद्धीने वापर करत आहे आणि त्यांची प्रतिमा मालिन करत आहे. राजकिय फायद्यासाठी शासकीय केंद्रीय यंत्रणेचा वापर होत असल्याने या घटनेचा जाहीर निषेध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करीत आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते .