एकनाथ खडसेंच्या प्रयत्नांनी अल्पसंख्यांक व शासकीय तंत्रनिकेतनच्या बांधकामासाठी ६ कोटी मंजूर
मुक्ताईनगर, प्रतिनिधी : मुक्ताईनगर येथे शासकीय तंत्रनिकेतन इमारत माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या प्रयत्नांनी मंजूर करण्यात आली होती त्याचे काम प्रगतीपथावर असून इमारत बांधकामासाठी अल्पसंख्यांक विकास विभागांतर्गत आता नव्याने सहा कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत या साठी जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ऍड रोहिणीताई खडसे खेवलकर यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता
मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात अल्पसंख्यांक बांधवांची संख्या मोठ्याप्रमाणावर असल्याची बाब लक्षात घेऊन त्यांच्या मुलांना गावातच तंत्र शिक्षण घेता यावे व समाजाचा विकास, उत्कर्ष घडून यावा या दृष्टिकोनातून अल्पसंख्यांक समाजासाठी शासकीय तंत्र निकेतन विद्यालय व्हावे यासाठी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगर येथे शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयाचे 57.56 कोटी रुपयांचे कामास सन 2015 मध्ये मंजुरी दिली होती या अल्पसंख्यांक तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे बांधकाम गेल्या पाच-सहा वर्षापासून सुरू आहे आता शासकीय तंत्रनिकेतन संस्थेच्या कार्यशाळा व प्रशासकीय इमारत पूर्णत्वास येण्यासाठी उर्वरित निधी ची आवश्यकता असल्याची बाब माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी अल्पसंख्यांक मंत्री महाराष्ट्र राज्य ना नवाब मलिक यांच्या समवेत चर्चा करून पत्रव्यवहार केला त्यानुसार अल्पसंख्यांक समाजासाठी नवीन शासकीय तंत्रनिकेतन संस्थेच्या कार्यशाळा व प्रशासकीय इमारतीचे उर्वरीत बांधकामासाठी अल्पसंख्यांक विभाग विकास विभागांतर्गत रुपये सहा कोटी मंजूर करण्यात आले आहे अशी माहिती एकनाथराव खडसे यांचे स्वीय सहाय्यक योगेश कोलते यांनी दिली लवकरच अल्पसंख्याक समाजासाठी सुसज्ज अशी नवीन शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयाची कार्यशाळा व प्रशासकीय इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास येऊन मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील गावांना तसेच आसपासच्या तालुक्यातील अल्पसंख्यांकांना ही याचा लाभ होणार आहे