ब्रेकिंग | मुक्ताईनगर येथे झालेल्या चिनावलच्या “त्या” इसमाच्या खुनाचा उलगडा; २ आरोपी जेरबंद !
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधि | तालुक्यांतील सातोद शिवारातील मुक्ताईनगर ते बोदवड जाणा-या रोडलगत चिनावल येथील इसमाच्या खुनाचे गुढ उघड झाले असून २ आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे.
तालुक्यांतील सातोड शिवारात मुक्ताईनगर ते बोदवड जाणारे रोडचे नाल्यात दिनांक 6/06/2023 रोजी सकाळी 08.00 वाजता “अनोळखी पुरुष जातीचे प्रेत अंदाजे 40 ते 45 वर्ष वयाचा इसम संशयीत रित्या पडलेला आढळून आले होते. घटनास्थळ हे सातोड ता. मुक्ताईनगर शिवारातील सिताराम लहानु बिचकुले रा. सातोड यांचे शेत गट नंबर 127 चे समोर मुक्ताईनगर ते बोदवड जाणारे सिमेंट रोडच्या डाव्या बाजूचे नाल्यात एक अनोळखी इसमाचे प्रेत त्याचे डोके रक्ताने माखलेल्या स्थितीत पडलेला मिळुन आला. त्यावरुन सदर अनोळखी इसमास कोणीतरी अज्ञात इसमाने जिवे ठार केल्याचे निष्पन्न झाले त्यावरुन
अनोळखी मयत इसमाची ओळख पटविण्याचे दृष्ट्रीने माहिती घेत असतांना. सावदा पोलीस स्टेशनचे सपोनि पळे यांनी पोलीस स्टेशनला मिसींग नंबर 24/2023 अन्वये दाखल असून मिसींग व्यक्तीचे नाव रविद्र मधुकर पाटील, वय- 46, रा. चिनावल ता. रावेर असे असून त्याचे उजव्या हातावर रोशनी नाव गोंदले असल्याचे सांगितल्याने मिसींग व्यक्तीचे नातेवाईकांना मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथे पाठविण्याबाबत सांगितले. तेव्हा मयताची पत्नी सौ. नम्रता रविंद्र पाटील व भाऊ योगेश मधुकर पाटील हे समक्ष पोलीस स्टेशनला हजर होवून मयताचे प्रेत पाहून मयत हा रविंद्र पाटील असल्याचे खात्री केली.
त्यावरुन योगेश मधुकर पाटील यांचे फिर्यादीवरुन मुक्ताईनगर पोलीस स्टेशन भाग-5 CCTNS NO. 200/2023 भादवि कलम 302, 201 प्रमाणे दाखल करुन अज्ञात आरोपीचा शोध पोलिसांनी सुरू केला असतां दिनांक 8/06/2023 रोजी दुपारी अज्ञात आरोपीचा शोध घेत असतांना गुन्ह्यातील अज्ञात मयत यास दिनांक 4/06/2023 रोजी मुक्ताईनगर शहरातील संशयीत राहुल संतोष काकडे व योगेश गजानन काकडे यांचे सोबत एकत्र पाहिल्याची माहिती मिळाली. त्यावरुन राहुल काकडे व योगेश काकडे यांची माहिती घेतली असता ते गावात मिळून आले नाही.
दिनांक 9/06/2023 रोजी पोलीस स्टेशनचे पथकातील अधिकारी व कर्मचारी संशयीत राहुल संतोष काकडे व योगेश गजानन काकडे यांचा शोध घेत असतांना ते मिळून आल्याने विचारपुस केली असता. रविंद्र पाटील यांच्याकडे 15000/- रुपये रोख असल्याचे समजल्याने त्यांनी त्यास मुक्ताईनगर ते बोदवड जाणारे रोडने एक किमी अंतरावर नेवून त्याचे जवळील पैसे, मोबाईल व इतर वस्तु काढून त्यास दगडाने जबर मारहाण करून जिवे ठार केले असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. सदर गुन्ह्यातील आरोपी 1) राहुल संतोष काकडे, वय 25, रा. रेणुकानगर रेणुकामाता मंदीराचे पाठीमागे मुक्ताईनगर ता. मुक्ताईनगर, 2) योगेश गजानन काकडे, वय 19, रा.जुनेगांव जुनी उर्दु शाळे जवळ मुक्ताईनगर ता. मुक्ताईनगर यांना अटक केली असुन गुन्ह्याचा तपास चालू आहे. या खुनाच्या गुन्ह्याचे तपासात पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, मुक्ताईनगर उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार शिंदे, मार्गदर्शनाखाली मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे श्री. संदीप दुनगहू व पथकाने कारवाई केली आहे.