भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगर

45 दिवसानंतर धावणार मुक्ताईनगर आगारातून एसटी बस

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुक्ताईनगर ,अक्षय काठोके। राज्य शासनाने एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनात विलीनीकरण करावे या प्रमुख मागणीसाठी 8 नोव्हेंबर 21पासून मुक्ताईनगर आगारातील तसेच राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता त्यात परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या पगार वाढ तसेच काही इतर मागण्या मान्य केल्या तसेच विलिनीकरणाची बाबी न्यायप्रविष्ट असल्याने आपण कामावर रुजू व्हावे असे वेळोवेळी आवाहन केले या आवाहनाला प्रतिसाद देऊन मुक्ताईनगर आगारातील यांत्रिकी 25, चालक 8 ,वाहक 8 या कर्मचाऱ्यांनी आपण कामावर रुजू होणार असल्याचे कळविले व उद्यापासून एसटी मुक्ताईनगर आगारातून धावणार असल्याचे आगार प्रमुख एस बी साठे यांनी मंडे टू मंडे न्यूज शी बोलताना सांगितले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!