शासकीय धान्याची चोरी करत काळ्या बाजारात विक्रीचा गोरखधंदा ; तर दुसरीकडे पत्रकारांच्या नावाने केली जातेय पैशांची वसुली? तालुक्यांत रंगली चर्चा !
मुक्ताईनगर, मंडे टू मंडे न्युज प्रतिनिधि | येथील शासकीय धान्य गोडाऊनमधून रोज रात्रीच्या सुमारास आठ ते दहा किंटल धान्याची चोरी होऊन ते काळ्या बाजारात विकले जात आहे. त्याला जबाबदार कोण? बाहेरील कोणी व्यक्ती की महसूल पुरवठामधीलच कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने हा प्रकार सुरू आहे. हा काळा गोरखधंदा म्हणजे शेतच कुंपण खाते की काय ? अशी परिस्थिती मुक्ताईनगर महसूल पुरवठ्याची झाली आहे. नागरिकांच्या सतर्कतेमुळे तीन दिवसाआधी रात्री धान्य गोडाऊनमध्ये चोरी झाली व अधिकाऱ्यांनी पंचनामा केला. परंतु अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नसून नेमका हा काय प्रकार आहे. पुरवठा विभागाचे अधिकारी, कर्मचारीच तर यात सहभाग नाही ना? अशी चर्चा परिसरात सुरू आहे. तर दुसरकडे तहसीलदार प्रशासनातील काही अधिकाऱ्यांकडून दिवाळीनिमित्त तालुक्यातील प्रत्येक रेशन दुकानदाराकडून पत्रकाराच्या नावाने पैशांची वसुली केली गेल्याची मोठी चर्चा दबक्या आवाजात सुरू असून दिवाळी निमित्त पत्रकारांचा धाक दाखवत तालुक्यातील प्रत्येक दुकानदाराकडून पैशांची वसुली केल्याची चर्चा रंगत आहे. तहसिल प्रशासनातील हे वसुली अधिकारि कोण ? याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहे ?
रात्री बारा ते एक वाजेच्या सुमारास शासकीय गोडाऊनमधून काही चोरटे धान्याच्या गोण्या चोरून घेऊन गेले. तात्काळ खबरदारी म्हणून महसूल, पुरवठा कर्मचारी व पोलीस त्या ठिकाणी गेले होते. परंतु वस्तुस्थिती पाहता हा काळा धंदा गेल्या बऱ्याच महिन्यांपासून सुरू असल्याचे समजले. एवढ्या सहज व जिकरीने चोरी होतेच कशी ?या मागचा मास्टर माईंड कोण? त्याचाही शोध घेणे गरजेचे आहे.परंतु महसूल प्रशासन ते शोधणे व गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ का करत आहे ? त्याची चौकशी होणे गरजेचे आहे
रोज आठ ते दहा गोण्या धान्य शासकीय गोडाऊन मधून पद्धतशीर व सामंजस्याने चोरी होत आहे परंतु जिल्हा प्रशासनाकडून मात्र एक किलो धान्य जास्तीचे मिळत नाही मग एवढे धान्य चोरी होऊन धान्यात तफावत का निर्माण होत नाही? असाही मोठा प्रश्न निर्माण होत आहे ,त्यात महसूल चे कर्मचारी व अधिकारी यांचा समावेश तर नाही ना ? असा तर विषय नाही ना की “तू मारल्याचे नाटक कर मी झोपल्याचे सोन घेतो “अशी चर्चाही नागरिकांमधून होत आहे.यात महसूल व पुरवठा प्रशासनाचे कर्मचारी तर नाही ना की असे गोरगरिबांच्या तोंडाचे हे अन्न चोरून काळ्या बाजारात विकत आहे त्याचीही खोलवर चौकशी होणे गरजेचे आहे.
पत्रकारांच्या नावाने केली जातेय पैशांची वसुली ? तहसीलदार प्रशासनातील काही अधिकाऱ्यांकडून दिवाळीनिमित्त तालुक्यातील प्रत्येक रेशन दुकानदाराकडून पैशांची वसुली केली गेल्याची मोठी चर्चा दबक्या आवाजात सुरू असून दिवाळी निमित्त पत्रकारांचा धाक दाखवत तालुक्यातील प्रत्येक दुकानदाराकडून पैशांची वसुली केल्याची चर्चा रंगत आहे. तहसिल प्रशासनातील हे वसुली अधिकारि कोण ? याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात असून दिवाळी निर्मित पत्रकाराचा धाक दाखवत त्यांच्या नावाने अशी पैसे वसूल करत हप्ते वसूली करणाऱ्या अश्या महसूल अधिकारि कोण ? यामुळें तहसिल प्रशासन मोठ्या चर्चेचा भाग बनला असून याबाबत चौकशीची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
शासकीय धान्य गोडाऊनला समोरच्या बाजूस असलेल्या शटरला कुलूप आहे परंतु त्याच मागील बाजूस असलेल्या शटरला आतून कुलूप न लावता साधे नट बोल्ट लावून चोरी करता चोरी करणाऱ्या सहज पर्याय दिला आहे तसेच शटर जवळील छोट्या खिडकीच्या ग्रील तुटलेल्या अवस्थेत असून त्यातून सहज एक दोन जण आत जाऊ शकतात,मागील शटरचे धान्याच्या गोण्या बाहेर फेकू शकतात इतकं सहज चोरी करणे तसेच धान्य गोडाऊन मध्ये किंवा आजूबाजूला एकही सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याची गरज आजपर्यंत कधी प्रशासनाला पडली नाही का? असे प्रकार अनेक वेळा घडले. गोरगरिबांना एक किलो ही धान्य जास्त देण्यास महसूल, व जिल्हा पुरवठा तयार नाही परंतु असे गोरगरिबांच्या वाटेचे धान्य चोरून काळ्या बाजारात विकले जातेच कसे? बाहेरील कोणी व्यक्ती अशा प्रकारची हिम्मत करीलच कसा? महसूल मधीलच कर्मचाऱ्यांच्या आर्थिक आशीर्वादाने तर हा गोरख धंदा सुरू नाहींना? हेही वरिष्ठ पातळीवरून चौकशी करणे गरजेचे आहे,गोरगरिबांच्या पोटावर घाला घालणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. महसूल चे रोठा निरीक्षक गावडे, सावकारे, पोलीस कर्मचारी रात्री उशिरापर्यंत उपस्थित होते.
मुक्ताईनगरला तहसीलदार मिळेल का? गेल्या आठ महिन्यांपासून मुक्ताइनगर तालुक्याला कायमस्वरूपी तहसीलदार मिळालेले नाही त्यामुळे प्रभारी राज असलेल्या अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक प्रभारी राज गाजविला जात आहे मुक्ताईनगर शहरातील एका विशिष्ट भागातून आठवड्यातून दोन ते तीन वेळा मोठा ट्रक बाहेर विक्रीसाठी तांदुळाचा माल घेऊन जातो याकडेही महसूलच्या कर्मचाऱ्यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा