आम्ही हप्ते देतो आमचे काय वाकडे होणार : मुक्ताईनगर येथे हप्तेखोरीचे मायाजाल, अवैध धंद्यांना खुलेय रान : वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही होतेय डोळे झाक : नागरीक विचारात !
मुक्ताईनगर, अक्षय काठोके : जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ, प्रवीण मुंढे यांनी जिल्ह्या पोलीस अधीक्षक पदाचा पदभार घेतला त्यानंतर ते मुक्ताईनगर येथे आले होते त्या वेळी त्यांनी हद्दीतील अवैध धंदे पूर्णपणे बंद करू, त्यांचेवर कारवाई करू, असे पत्रकारांशी बोलताना आश्वासन दिले होते. परंतु एकंदरीत पाहता स्थानिक पोलीस प्रशासन त्यांच्या आदेशाला पद्धतशीर पायदळी तुडवत असून अवैध धंदे बंद सारखी कुठलीच अशी कुठलीही परिस्थिती दिसून येत नाही, पोलीस कर्मचाऱ्यांच्या निगराणीत मुक्ताईनगर शहरासह तालुक्यात अवैध धंदे अव्याहत पणे खुलेआम बिनबोभाट पणे सुरू असून चौकात व गल्लोगल्ली मटका व पत्त्याचे डाव खुलेआम रंगत असून अड्डे भर रस्त्यावर भरत असल्यामुळे शाळकरी मुलं याकडे आपोआप ओढल्या जात असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यामध्ये प्रत्येक गावांमध्ये सट्टा, पत्ता जोरात सुरू असून अवैध धंदे वाईक म्हणतात आम्ही साहेबांना हप्ते देतो आमचे कोण काय वाकड करून घेणार यामुळेच याकडे पोलीसांचे दुर्लक्ष करीत असल्याची जोरदार चर्चा तालुक्यात सुरू आहे. मुक्ताईनगर शहरातील प्रमुख चौकांसह परिवर्तन चौका लगतच काही हात गाड्यांमध्ये मटका खेळला जातो, एवढेच नाही तर बस स्टॅन्ड लगत व अगदी तहसील कार्यालय पोलीस स्टेशन जवळील रस्त्यांवरही सट्टा पिढी जोरात सुरू आहे. याकडे पोलिस प्रशासनाचे लक्ष नसावे असे होणे तर शक्य नाही त्यामुळे आम्ही साहेबांना हप्ते देतो यात सत्यता तर नाही ना ? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहे.
शहरातील परिवर्तन चौका लगतच असलेल्या दोन रस्त्यांवर्ती असलेले एक बु-हाणपूर रोड वर असलेले एस. एम. कॉलेज व जुनेगाव रोडवर जे.ई. स्कूल असे दोन विद्यालय असून शाळकरी तरुण मुलं, मुली त्याच रस्त्याने ये-जा करत असतात व त्यांचा बस थांबा हा त्याच रस्त्यावर आहे त्यांना त्या ठिकाणी वर्दळ असल्याचे दिसून येत असून नेमके त्या ठिकणी काय असा प्रकार बघण्यासाठी जात असतात व ते बघितल्यावर त्या ठिकणी चालू असलेला मटका चा खेळ बघून त्यांचे चिमुकल्यांचे मन मटका खेळण्या कडे भरकटत असून वाईट मार्गाला काही शाळकरी मुलं लागत आहे तुलसी मेडिकल पासून जो रस्ता एस एम कॉलेज कडे जातो त्या रस्त्यावर मटका मोठ्या प्रमाणात खेळला जात आहे त्याच रस्यावर दवाखाने व किराणा दुकान असून लहान मुले किंवा मोठी माणसे महिला मुली ये जा करत असतात त्यांना सुद्धा या बाबत ची चीड येत आहे याला नागरिक खत्री गल्ली च्या नावाने सुद्धा ओळखत आहे अशी नागरिकांत चर्चा आहे
याकडे पोलिस प्रशासन का लक्ष देत नाही चौकामध्ये प्राण घातक हल्ले हवे मध्ये गोळीबार करणारे भाईगिरी गुंड प्रवृत्तीचे नागरिक समाजामध्ये भीती चे वातावरण निर्माण करणारे काही गुंड प्रवृत्तीचे नागरिक अशा लोकांना आळा बसावा. याच ठिकाणी अवैध धंद्यांचा सुळसुळाट आहे व विशेष म्हणजे ह्याच चौकात नेहमी २ पोलीस कर्मचारी पहारा देत असतांनाही त्यांच्या लक्षात हा प्रकार येऊ नये हे सुद्धा आचर्यच.म्हणून तर कॅमेरे बसवले जात नाही ना की यात काही देवाण घेवाण चा आर्थिक व्यवहार चालत आहे. जर असे असेल तर नेमका तो हप्तेखोर व दर महिन्याला लाखोंची वसुली करणारा पोलीस कर्मचारी कोण ? असा प्रश्न मुक्ताईनगरातील सूज्ञ नागरिक उपस्थित करीत आहे
पोलिसांची वर्दळ असलेल्या ठिकाणाहून अवैध धंद्याबाबतची कल्पना स्थानिक पोलिस प्रशासनाला नसणे म्हणजे आश्चर्यचय आहे की. असे असताना अवैध धंद्यावर ‘मासिक टार्गेट’ पूर्ण करण्यासाठी धाड टाकण्यात येते. या धाडीत पैसा, ‘चेल्याचपाट्या’ ला ताब्यात घेवून पोलिस कारवाईचा आव आणतात. त्यातून सर्व‘आलबेल’ असल्याचे भासवले जाते. प्रत्यक्षात मात्र, पोलिसांचे अवैध व्यावसायिकांशी आर्थिक संबंध हे त्यांना धंदा सुरू ठेवु देण्यासाठीच असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. आता याप्रकरणी वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात याकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.