भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगरराजकीय

Video| “स्वराज्य ध्वज” यात्रेचे कोथळी येथे स्वागत व ध्वज पूजन

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुक्ताईनगर, प्रतिनिधी : कर्जत येथील ऐतिहासिक खर्ड्याच्या ऐतिहासिक शिवपट्टण किल्ल्यात उभारण्यात येणाऱ्या देशात सर्वांत उंच (७४ मीटर) भगव्या ‘स्वराज्य ध्वज’चा राज्य व देशातील ध्वज पूजन यात्रेचे तापी तीरावरील संत मुक्ताबाई समाधीस्थळी जुने मंदिर कोथळी मुक्ताईनगर येथे यात्रेचे स्वागत व ध्वज पूजन करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून ७४ मीटर उंचीचा ‘भगवा ध्वज’ अर्थात ‘स्वराज ध्वज’ शिवपट्टण किल्यावर दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर उभारण्यात येणार आहे. तत्पूर्वी महाराष्ट्रासह देशातील विविध ७४  धार्मिक, आध्यत्मिक स्थळी, स्मारक व गडकिल्ल्यांवर या स्वराज ध्वजाचे पुजन होत आहे. आज श्री संत आदिशक्ती मुक्ताई  अंतर्धान स्थळ कोथळी येथे या स्वराज ध्वजाचे आगमन झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष रविंद्र भैय्या साहेब पाटील, जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांनी ध्वजाचे पुजन केले.  मुक्ताई अंतर्धान स्थळावरील पवित्र माती ध्वज उभारणीसाठी ध्वजा समवेत आलेल्या नानासाहेब गवळी, ऋषिकेश खरभजन, रामदास दुधाळ, संदिप शिंदे यांच्याकडे सुपूर्द केली.  यावेळी बाजार समिती सभापती निवृत्तीभाऊ पाटील, जेष्ठ नेते वसंतराव पाटील, जिल्हा सरचिटणीस ईश्वरभाऊ रहाणे, काँग्रेस जिल्हा सरचिटणीस डॉ. जगदीशजी पाटील, राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष पवनभाऊ पाटील, तालुका अध्यक्ष  यु. डी. पाटील सर, माफदा अध्यक्ष रामभाऊजी पाटील, माजी सभापती राजु भाऊ माळी, संदिपभाऊ देशमुख, हभप रविंद्र महाराज हरणे,हभप विशाल महाराज खोले, अनिलभाऊ वराडे, प्रमोदभाऊ धामोडे, प्रदिपभाऊ बडगुजर, शिवराजभाऊ पाटील, नारायणराव चौधरी, रवींद्र खेवलकर, वंदनाताई पाटील, निताताई पाटील, सुषमाताई खोसे , भरतअप्पा पाटील, विनोदभाऊ सोनवणे, साहेबराव पाटील, लिलाधार पाटील, संजय कोळी, सम्राटभाऊ पाटील, हर्षलभाऊ झोपे, निलेशभाऊ बोराखडे,नितेश राठोड, दिपकभाऊ मराठे, उद्धव महाराज जुनारे,पंकज महाराज ,हर्ष कोटेचा व इतर पदाधिकारी भाविक उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!