भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगर

युवतीची सतत लग्न करण्याच्या मागणीला कंटाळून युवकाची पूर्णा नदीत उडी घेत आत्महत्या

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुक्ताईनगर,मंडे टू मंडे वृत्तसेवा। तालुक्यातील उचंद येथील एका २५ वर्षाच्या युवकाने युवतीची सतत लग्न करण्याच्या मागणीला कंटाळून पूर्णा नदीत उडी घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज उघडकीस आली असून यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .

या बाबत अधिक माहिती अशी की,अजय सिताराम इंगळे (वय-२५) असे मयत युवकाचे नाव असून हा युवक आपल्या परिवारासह उचंदा येथे राहत असून त्याच्या गावातील २८ वर्षीय युवतीने गेल्या काही महिन्यांपासून तिच्याशी लग्न करावे अशी मागणी करीत होती. याला अजय याचा साफ नकार होता.मात्र लग्नासाठी वारंवार होत असलेल्या मानसिक छळाला कंटाळून अजयने ८ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास खामखेडा पुलाच्या पुर्णा नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्‍कादायक घटना समोर आली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मयताचा भाऊ मनोज इंगळे यांच्या फिर्यादीवरून तरूणीवर मुक्ताईनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदिप शेवाळे करीत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!