भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्रमुक्ताईनगर

मुक्ताईनगरचे आ.चंद्रकांत पाटील यांची प्रकृती अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी | सद्य स्थितीत मुंबईमध्ये महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 सुरु असतांना आज दि. 5 मार्च 2026 रोजी गुरुवारी हाऊस मध्ये कामकाज सुरु असताना मुक्ताईनगर मतदार संघांचे आमदार चंद्रकांत पाटील यांची तब्येत अचानक खालावली असता तातडीने त्यांना एच.एन रिलायन्स हॉस्पिटल,मुंबई येथे दाखल केले.

यावेळी शिवसेनेचे नेते तसेच खासदार डॉ.श्रीकांत शिंदे व राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रुग्णालयात जाऊन तब्येतीची विचारपूस करून डॉक्टरांना योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या असून एच.एन रिलायन्स हॉस्पिटलच्या वरिष्ठ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आता त्यांची तब्येत स्थिर असल्याचे स्वीय सहायक प्रवीण चौधरी यांनी कळविले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!