भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगरराजकीयरावेर

मुक्ताईनगर ची लढत लक्ष्यवेधी, पूर्वीच्याच प्रतिस्पर्ध्यांमध्येच मुख्य लढत..कोण जिंकणार..

काय आहे  पूर्वीचा इतिहास ?

भानुदास भारंबे.
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l मुक्ताईनगर विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील शिवसेना चंद्रकांत निंबा पाटील यांना उमेदवारी दिली आहे, तर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार ADV. खडसे रोहिणी एकनाथराव यांना उमेदवार म्हणून निवडलं आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष चे उमेदवार चंद्रकांत निंबा पाटील यांनी विजय मिळवला होता.

राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये मुक्ताईनगर मतदारसंघ देखील राज्यातील राजकारणात एक महत्त्वपूर्ण स्थान ठेवतो. या मतदारसंघावर भाजपाचे एकछत्री वर्चस्व आहे, आणि येथून एकनाथ खडसे हे भाजपाच्या तिकिटावर अनेक वर्षे निवडून आले होते.

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ एकनाथ खडसे यांचा हा बालेकिल्ला. खडसेचं राजकारण वाढलं, रुजलं ते याच मतदारसंघात. तब्बल सहा टर्म प्रतिनीधीत्व केलेल्या याच नाथाभाऊंना मुक्ताईनगरचं तिकीट मिळेल का, अशी परिस्थिती २०१९ मध्ये उद्भवली होती. पण पक्षातला विरोध पाहता त्यांनी आपली मुलगी रोहिणी खडसे यांना मुक्ताईनगरची उमेदवारी मिळवून दिली. भाजप–शिवसेना युती झाल्यामुळे शिवसेनेच्या चंद्रकांत पाटील यांनी बंडाळी करत अपक्ष लढत लढवली होती. पण नाथाभाऊंच्या राजकारणाला शह देण्यासाठी पक्षातील आणि पक्षाबाहेरील अनेकांनी रसद पुरवून अपक्ष चंद्रकांत पाटील यांना निवडून आणलं.

रोहिणी खडसे म्हणजेच एका अर्थाने एकनाथ खडसेंच्या मुक्ताईनगरमध्ये झालेला पराभवाने खडसेंचा बालेकिल्ला ढासळला. यानंतर त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश आणि पुन्हा त्यांची घरवापसी आणि पुन्हा राष्ट्रवादी असा प्रवास झाला.

सध्या विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील हे शिवसेना शिंदे गटात असल्याने त्यांना  महायुतीकडून उमेदवारी मिळाली. तर रोहिणी खडसे ह्या  शरद पवार गटा कडून माहाविकास आघाडी कडून त्या मुक्ताईनगर मधून रिंगणात आहेत, आता रोहिणी खडसे विरुद्ध चंद्रकांत पाटील असा इथला अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळाला.

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ हा राज्यातील त्याच मतदारसंघांपैकी एक आहे जो भाजपाचा गड मानला जातो. इथे भाजपाचे प्रमुख नेते एकनाथराव गणपतराव खडसे, म्हणजेच एकनाथ खडसे, सलग 6 वेळा निवडून आले आहेत. भाजपाची आणि एकनाथ खडसेंची ही विजयी यात्रा 2019 च्या निवडणुकीत थांबली. 2019 च्या निवडणुकीत मिळालेल्या पराभवानंतर, एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून एनसीपीमध्ये प्रवेश केला होता.

मुक्ताईनगर मतदार संघाच्या इतिहासावर एक नजर
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ हा राज्यात एकनाथ खडसे यांच्या नावाने ओळखला जातो. 1990 पासून भाजपाने या मतदारसंघात कधीही पराभवाची चव चाखली नाही. 1990 ते 2014 पर्यंत एकनाथ खडसेच या मतदारसंघात निवडणूक लढवत आणि विजयी होत आले. मात्र, 2019 च्या निवडणुकीत काहीतरी वेगळं घडलं. या निवडणुकीत एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी एकनाथ खडसे यांनी भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यांच्याविरोधात चंद्रकांत निंबा पाटिल यांनी स्वतंत्रपणे उमेदवारी जाहीर केली होती. या निवडणुकीत चंद्रकांत पाटिल आणि रोहिणी खडसे यांच्यात कडक टक्कर झाली, पण अखेर चंद्रकांत पाटिल यांनी 1,957 मतांनी विजय मिळवला.

आता याच मतदार संघात विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात पुन्हा रोहिणी एकनाथराव खडसे यांची लक्षवेधी लढत आहे. पूर्वीच्याच प्रतिस्पर्ध्यांमध्येच ही मुख्य लढत असून हा सामना अटीतटीचा असल्याने कोण बाजी मारणार हे येत्या काही तासातच समोर येईल!

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!