क्राईमबोदवळमुक्ताईनगर

लाच घेतल्याप्रकरणी बोदवड तहसीलदार निलंबित, महसूल विभागाची कारवाई

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुक्ताईनगर (प्रतिनिधी)। दोन लाखाची लाच घेतल्या प्रकरणी एसीबीच्या पथकाने कारवाई केलेले बोदवडचे तहसीलदार हेमंत पाटील यांना निलंबीत करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बोदवड तहसील हद्दीतील सातबारा उतारा तक्रारदाराच्या पत्नीच्या नावावर लावण्यासाठी दोन लाखांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. या अनुषंगाने एसीबीच्या पथकाने सापळा रचून तहसीलदार पाटील यांच्यासह मंडळ अधिकारी संजय झेंडू शेरनाथ व तलाठी निरज पाटील या तिघांना १८ डिसेंबर रोजी ताब्यात घेतले होते. या नंतर बोदवडचे तहसीलदार हेमंत भागवत पाटील यांच्यावर महसूल विभागाने निलंबनाची कारवाई केली असून त्यांच्या निलंबनाचा आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाल्याने महसूल विभागात खडबड उडाली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!