केळी लोडिंग करण्यासाठी रॅक वाढवून देण्याचे खा.रक्षा खडसेंना शेतकऱ्यांचे निवेदन
मुक्ताईनगर (प्रतिनिधी)। किसान रेल्वेच्या माध्यमातून केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितार्थ योजना सुरू केली आहे या योजनेचा फायदा शेतकऱ्यांना होण्यासाठी सबसिडी देखील दिलेली आहे. मात्र सांगोला ते नया आझादपूर येथे व्ही.पी.यु रँक रावेर रेल्वे स्टेशनवर वाढवून मिळावा या मागणीसाठी खासदार रक्षा खडसे यांना शेतकऱ्यांकडुन निवेदन देण्यात आले. तसेच रावेर व निभोरा रेल्वे स्थानकांवर थांबा मिळून व्ही.पी.यु. रँक वाढवून देण्यासंदर्भात डी.आर.एम.शी चर्चा करून निवेदन देण्यात आले.
गावातील शेतीमाल इतर राज्यात किंवा इतर जिल्ह्यात विक्री करण्यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी कोरोनाच्या काळात किसान रेल्वे सुरु केली. रावेर येथे मात्र वेळोवेळी रेल्वे प्रशासनाला लेखी मागणी करून अजून पर्यंत शेतरकर्यांना रॅक भरणीची परवानगी देण्यात आली नाही, या योजनेचा जास्त लाभ केळी उत्पादक शेतकऱ्यांना व्हावा यासाठी रेल्वे प्रशासनाने सांगोला ते नया अझादपूर यांच्यासह रावेर आणि निभोरा स्थानकांवर रँक खुली करून शेतकऱ्यांना त्यांचा माल भरणा करण्यासाठीची परवानगी मिळावी याकरिता फळ बागायीतदार शेतकरी मंडळ रावेर यांनी खा.रक्षा खडसे याना निवेदन दिले. फळ उत्पादक शेतकऱ्यांना ऐन मागणीच्या काळात शेतीमाल विकता यावा यासाठी रेल्वे प्रशासनाने त्वरित रँक वाढवून द्यावी असे निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या हितार्थ केंद्रातून मदत मिळवून देण्यासंदर्भात खासदार रक्षाताई खडसे यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केले.