भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगरसामाजिक

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आदिशक्ती मुक्ताई व चांगदेव महाशिवरात्री यात्रा रद्द

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुक्ताईनगर (प्रतिनिधी)।  जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव लक्षात घेता आदिशक्ती मुक्ताई व चांगदेव महाशिवरात्री यात्रा मुक्ताईनगर तहसीलदार यांनी रद्द करण्यात येत असल्याचे प्रेस नोट द्वारे जाहीर केले आहे.   

जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुक्ताईनगर तालुक्यातील मुक्ताई मंदिर ,जुने कोथळी ,नवे मुक्ताई मंदिर, मुक्ताईनगर, चांगदेव महाराज मंदिर ,चांगदेव व श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई देवस्थान, मेहूण,तालुका – मुक्ताईनगर जिल्हा जळगाव येथे दरवर्षी प्रमाणे महाशिवरात्री निमित्त मोठा यात्रा उत्सव आयोजित करण्यात येत असतो या वर्षी दिनांक ०८/०३ /२०२१ ते दिनांक ११/३/२०२१ दरम्यान यात्रा उत्सव होणार होता परंतु सध्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये कोरोना विषाणू चे वाढते प्रमाण लक्षात घेता सदर यात्रा रद्द करण्यात येत आहे जेणे करून उक्त नमूद ठिकाणी कुठली गर्दी / जमाव होणार नाही व कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव/फैलाव होणार नाही असे तहसीलदार श्वेता संचेती यांनी जाहीर सुचने द्वारे कळविले आहे,तरी सर्व भक्तांनी नियमाचे पालन करावे असेही म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!