कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मुक्ताईनगर बाजारपेठेच्या वेळेत बदल
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुक्ताईनगर (अक्षय काठोके)। राज्यासह जिल्ह्यात कोरोना संसर्गजन्य आजार पुन्हा आपला प्रभाव दाखवायला सुरवात केली असल्याने कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मुक्ताईनगर बाजारपेठेच्या वेळेत बदल करण्यात आले असून आठवले बाजार मात्र बंद राहणार आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की जळगाव जिल्ह्यात सध्या कोरोनाने डोके वर काढले असून कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज तहसील कार्यालय येथे बैठक आयोजित केली होती त्यात मुक्ताईनगर मधील दुकाने सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहतील असे ठरविण्यात आले तसेच दूध डेरी सकाळी 6 ते 10 व संध्याकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहतील रविवारचा आठवडे बाजार बंद राहील तसेच चौफुली वरती भरणारा भाजीपाला व फ्रुट मार्केट नेमुन दिलेल्या इतर गावातील पाच ठिकाणी भरेल त्यात नवीन बस स्टँड ,अलंकार एम्पोरियम ,आय सी आय सी बँक जवळ ,जुने गावातील बस स्टँड व नाट्यगृह जवळ भाजीपाला व फळाचे दुकाने राहतील हा निर्णय घेण्यात आला बैठकीला नगराध्यक्ष नजमा तडवी, तहसीलदार श्वेता संचेती ,पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे ,आरोग्य अधिकारी डॉक्टर योगेश राणे व मुक्ताईनगर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बंटी जैन उपस्थित होते