भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमुक्ताईनगरव्हिडिओ

Video। चक्क रस्त्यावरच कोरोना अँटीजन टेस्ट : मुक्ताईनगर प्रशासन ॲक्शन मोड मध्ये

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुक्ताईनगर (प्रतिनिधी): संचारबंदी लागू करण्यात आली असल्याने रस्त्यावर फिरत असणाऱ्याची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यास सुरवात झाली असून मुक्ताईनगर पोलिस देखील ॲक्शन मोड मध्ये असून नगर पंचायत कर्मचारी, आरोग्य प्रशासनाने सरळ रस्त्यावरच कोरोना अँटीजन टेस्ट करणे सुरू केलेले आहे.जे ही पॉझिटिव्ह सापडतील त्यांना क्वारंटाईन करण्यात येऊन त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहे.
पहा याबाबतचा हा ग्राउंड रिपोर्ट

तसेच शासनाने कोव्हीड संदर्भात कर्फ्यु घोषित केलेला आहे, कोणीही विनाकारण घराचे बाहेर निघू नये, अन्यथा त्यांची कोव्हिड तपासणी करून कोव्हीड सेन्टर येथे दाखल करण्यात येईल व कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांनी केले आहे. यावेळी पोलिस उपनिरिक्षक  परवीना  तडवी, पोहेकाॅ मोजेस पवार, गणेश चौधरी, गणेश मनुरे, श्रावण जवरे ,हरीश गवळी , होमगार्ड सोपान बेलदार, अनिल शिंदे मनोज पाटील, सुनंदा भोई, नगरपंचायत कर्मचारी गणेश कोळी, रोहित महाजन, संदिप सुरवाडे, प्रदिप पाटील, सुरेश अलोणे कोरोना काळात ऑनड्युटी कर्तव्य बजावीत आहेत .

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!