अंतुर्ली फाट्यावर एलसीबी कडून २२ लाखाचा गुटका मुद्देमलासह जप्त
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुक्ताईनगर (अक्षय काठोके): मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली फाटा येथे अवैध गुटख्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून छापा टाकून 22 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, याआधी मागील ५ दिवसांपूर्वी ४ लाख ५०००० हजार रुपयांचा घुटका जप्त करण्यात आला होता आणि आता पुन्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटका जप्त करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की गुप्त माहितीद्वारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली फाटा येथे दिनांक 19 फेब्रुवारी 2021वार शुक्रवार रोजी रात्री उशिरा 11 वाजून 40 मिनिटांनी बोलेरो मालवाहतूक गाडी MH 28BB 0757 या गाडीची तपासणी केली असता या गाडीमध्ये प्रतिबंधित केलेला विमल गुटका आढळून आला त्याची किंमत 16 लाख 22 हजार सातशे वीस रुपये, मालवाहतूक गाडी तिची किंमत 5 लाख रुपये, असा एकूण 21लाख 22हजार सातशे वीस रुपयांचा मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत करण्यात आला आरोपी गोविंदा विश्वनाथ राऊत व गोविंदा सुभाष आखरे दोन्ही राहणार – टूनकी ,तालुका- संग्रामपुर,जिल्हा -बुलढाणा, या आरोपींना अटक करण्यात आली आहे त्यांच्यावर कलम 328 272 273 या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार अशरफ शेख पीएसआय सुधाकर लहारे सुनील दामोदरे जितेंद्र पाटील प्रीतम पाटील दीपक पाटील दीपक शिंदे यांच्या पथकाने केली व पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे करीत आहे. गेल्या ५ दिवसातील ही दुसरी कारवाई असून एवढ्या मोठ्या प्रमाणात घुटका येतो कुठून हे कोडंच आहे…? संबंधित जप्त केलेल्या वाहनाचा फोटो काढण्यासाठी गेले असता फोटो काढण्यासाठी मज्जाव करण्यात आला, परिसरात पसरलेल्या अवैध गुटक्याचे जाळे मोडीस काढण्याचे आव्हान स्थानिक प्रशासना समोर आहे.