अवकाळी वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची खा.रक्षा खडसे कडुन पाहणी
मुक्ताईनगर प्रतिनिधी। अवकाळी आलेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांसह सामान्य जनतेच्या झालेल्या नुकसानीचा खासदार रक्षाताई खडसे यांनी समक्ष पाहणी करून आढावा घेतला
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाववाढत असून दुसरीकडे निसर्गाचेही कालचक्र बिघडलेले आहे. यात अडचणीच्या कात्रीत सापडला आहे तो शेतकरी. दोन दिवसांपूर्वी आलेल्या अवकाळी वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचा मका आणि केळी या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच काही घरांचेही नुकसान झालेले आहे. या अवकाळी आलेल्या वादळामुळे शेतकऱ्यांसह सामान्य जनतेच्या झालेल्या नुकसानीची कोथळी येथील मानेगाव शिवारात भाजपा खासदार रक्षाताई खडसे व मुंढे तलाठी माणेगाव शिवार तहसीलदार संचेती मॅडम मुक्ताईनगर यांनी समक्ष पाहणी करून आढावा घेतला.
शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीत संरक्षण देण्याची व्यवस्था अंमलात आणणे आवश्यक आहे. झालेलं नुकसान भरून काढणे शेतकऱ्यांना शक्य नाही. त्यामुळे राज्यसरकारने व केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या नैसर्गिक आपत्तीत होणाऱ्या नुकसानाची प्राधान्याने दाखल घेणे आवश्यक आहे. अवकाळी आलेल्या पावसामुळे माधव भास्कर पाटील यांचे घर पडलं. तसेच घरांचेही नुकसान झालेले आहे. समक्ष खासदार रक्षाताई खडसे पाहणी करण्यासाठी आल्यामुळे शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानी बाबत आक्रोश व्यक्त करून मदतीची हाक दिली. खासदारांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देऊन मदतीचे आश्वासन दिले. यावेळी देवीदास चौधरी, शंकर चौधरी, रामदास चौधरी, पंकज चौधरी, भानुदास चौधरी, ग्रामपंचायत सदस्य उमेश राणे, अमित चौधरी, योगेश चौधरी, योगेश पाटील, मीराबाई पाटील, विजय चौधरी सर, चंद्रकांत चौधरी, श्रीकृष्ण चौधरी, अविनाश चौधरी, माधव भास्कर पाटील आदींसह नुकसानग्रस्त शेतकरी व सामान्य जनता आपली व्यथा मांडण्यासाठी जमले होते.