जळगावची केळी जाणार पाकिस्तानात; खासदार रक्षा खडसेंचे कृषिमंत्रांना निवेदन
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुक्ताईनगर (प्रतिनिधी)। जळगावातील केळीला देशभरात मागणी वाढू लागली असून रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या केळीला पाकिस्तानात निर्यात करण्याबाबत खासदार रक्षाताई खडसे यांनी कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांना निवेदन दिले आहे. याबाबत तोमर यांच्याशी सकारात्मक चर्चा करण्यात आली आहे.
जळगावच्या केळीची लोकप्रियता हळूहळू संपूर्ण देशात वाढू लागलेली आहे. त्यामुळे देशांतर्गत केळीची मागणीही आता वाढू लागलेली आहे. भारत व पाकिस्तान देशातील तणावामुळे पाकिस्तानसोबत व्यापाराला कमी प्राधान्य दिले जात होते. परंतु भारत पाकिस्तानच्या व्यापाराचे व्यवहार आता पूर्ववत होत असून भारतातून कापूस आणि इतर शेतकी उत्पादन सुरळीत निर्यात होऊ लागले आहेत. या अनुषंगाने केळी फळपीक पाकिस्तानात निर्यात करण्याबाबत कृषी मंत्र्यांनासोबत खासदारांनी सकारात्मक चर्चा केली. पाकिस्तानात केळी निर्यातीस मंजुरी मिळाल्यास बारामाही केळीचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना मोठी संधी निर्माण होऊन पाकिस्तानसोबत व्यापाराचे संबंध दृढ होऊ शकतात. छोट्या शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनाही केळी निर्यातीच्या माध्यमातून अनेक संधी निर्माण होणार आहेत. तसेच तरुणांनाही रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होऊन मजुरांना आर्थिक बाळकटीही मिळू शकणार आहे. केळी फळपिक लवकरच पाकिस्तानात निर्यात होण्यासाठी कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी सकारात्मकता दर्शविलेली आहे. त्यामुळे जळगावची केळी ही पाकिस्तानात निर्यात होण्यासाठी भारतीय दूतावासाने सकारात्मकता दर्शवून जळगाव जिल्ह्यातील केळी फळपीक पाकिस्तानात निर्यातीबाबत सकारात्मकता दर्शवावी असे खासदार रक्षाताई खडसे यांनी कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांना पत्राच्या माध्यमातून निवेदन दिले आहे.