स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून मुक्ताईनगर येथे अवैध गुटख्यावर मोठी कारवाई
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुक्ताईनगर (अक्षय काठोके) : जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध गुटका विक्रीचे प्रमाण वाढले असून गुटका माफियाचा धुमाकूळ सुरूच आहे.
गुटका माफिया खुलेआम गुटख्याची तस्करी करीत अस्तानस स्थानिक गुन्हे शाखा यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील कर्की फाटा येथे मध्यप्रदेशातून येणाऱ्या MH15CT6517 या ओमनी गाडीवर छापा टाकला या गाडीमध्ये प्रतिबंधित केलेला विमल गुटखा त्याची किंमत 4,50,000 रुपये चार लाख पन्नास हजार चार चाकी ओम्नी गाडी किंमत 1,00,000 एक लाख रूपये असा साडे पाच लाखाचा मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत करण्यात कारवाईवेळी राजेंद्र गोसावी व पुरुषोत्तम पोलाखेरे या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे व त्यांच्यावर आयपीसी कलम 328 188 272 273 प्रमाणे फिर्यादी दीपक शिंदे यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला तसेच त्यांच्या पथकात अशरफ खान सागर सावे नितीन चौधरी उमेश महाजन हे सहभागी होते तसेच पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश सोळुंके करीत असून परिसरात अवैध गुटख्याची मोठे जाळे पसरले असून ते मोडीत काढण्याचे आव्हान स्थानिक प्रशासना समोर आहे.
हेही वाचा- मुक्ताईनगर मध्ये अवैध गुटख्याची खुलेआम विक्री, याना आशीर्वाद कोणाचा ?