पहाटेच्या लोडशेडिंगच्या वेळेत तात्काळ बद्दल करावा– मुक्ताईनगर शिवसेनेचे निवेदन
मुक्ताईनगर प्रतिनिधी : ग्रामीण भागात गेल्या अनेक दिवसांपासून पहाटेची लोडशेडिंग महावितरण तर्फे सुरू असून शेतकऱ्यांना शेतातील कामे उरकण्यासाठी पहाटेच सूर्योदयापूर्वी घरातून बाहेर पडावे लागते. परंतु सकाळीच बत्ती गुल झाल्याने खूप त्रास सहन करावा लागतो .अशातच मुस्लिम समाजातील पवित्र रमजान महिना सुरू असून त्यांना देखील रोजा (उपवास) याची सुरुवात करताना दैनंदिन लगबग ही पहाटेच असते. त्यामुळे सकाळच्या लोडशेडिंग मध्ये तात्काळ बदल करून ती स.6 वाजेनंतर करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या वतीने तहसीलदार व महावितरण ला देण्यात आले. नायब तहसीलदार श्री पानपाटील यांनी निवेदन स्वीकारले.
देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे कि , सद्या मुस्लीम समाजात अतिशय पवित्र मानल्या जाणारा रमजान महिना सुरु असून या काळात मुस्लीम समाजातील प्रत्येक सदस्य अतिशय श्रद्धेने रोजे (उपवास करीत असतात. त्यामुळे गाव खेड्यातील अगदी पहाटेच्या वेळात म्हणजेच सकाळी ४ ते ५:३० वाजेपर्यंत मुस्लीम बांधव, भगिनी रोजे च्या तयारीत असतात हि वेळ दिवसभराचे रोजेचे नियोजन करण्यासाठी अत्यंत महत्वाची असते. आज १३ वा रोजा होता तर उद्या १४ असणार आहे. याकाळात म.रा.वि.वि.कं तर्फे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर लोडशेडिंग केली जाते. यातच शेतकरी बांधवाना देखील शेतात जाण्यासाठी सकाळची वेळ महत्वाची असल्याने शेतकऱ्यांची देखील सकाळची लोडशेडिंग वेळ बदल्यात यावी अशी गेल्या अनेक दिवसांपासून मागणी आहे. रमजान महिन्यात सुरु असलेल्या या पहाटेच्या वेळी सुरु असलेल्या लोडशेडिंगमुळे अंतुर्ली, उचंदा, बेलसवाडी, कुऱ्हा, जोंधनखेडा, धामणगाव, बोरखेडा यासह अनेक गावात मुस्लीम समाजाला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे . या करीता दररोज सकाळी करण्यात येणाऱ्या लोडशेडिंगच्या वेळेत तात्काळ बदल करण्यात येवून सकाळी ६ वाजे नंतर लोडशेडिंग करण्यात यावी . वेळेत बदल तात्काळ करण्यात यावा अन्यथा शिवसेना स्टाईल ने आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. यांची होती उपस्थिती तालुका प्रमुख छोटू भोई, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील, उपतालुका प्रमुख प्रफुल्ल पाटील, माजी उप तालुका प्रमुख राजेंद्र तळेले, शहर प्रमुख गणेश टोंगे, नगरसेवक संतोष मराठे, कुऱ्हा शहर प्रमुख पंकज पांडव , नितीन कांडेलकर , जितेंद्र (गोलू) मुर्हे आदी पदाधिकारी शिवसैनिकांची उपस्थिती होती .