भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगर

मुक्ताईनगर मधील प्लॉट धारकाची दबंगगिरी, अवैधरित्या पोल गाडून केला रस्ता बंद !

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुक्ताईनगर (अक्षय काठोके)। मुक्ताईनगर नगर येथील तहसील रोडवर रामदास किसन सापधरे या व्यक्तीचा खाजगी प्लॉट असून प्लॉट व्यतिरिक्त शेजारी सरकारी जागा असताना व तेथून मागे राहत असलेल्या दोनशे घरांचा वहिवाटीचा रस्ता तसेच मागे गणपती मंदिरात जाण्याचा रस्ता असतानासुद्धा अवैधरीत्या पोल गाडून रस्ता बंद करण्याचा घाट घातला आहे

    या व्यक्तीने तीन वर्ष आधी सुद्धा असंच बांधकाम करून रस्ता बंद करण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा या भागातील रहिवासी  तहसील कार्यालयात  उपोषनास बसले होते 5 मार्च 2018 ते 8 मार्च 2018 पर्यंत येथील स्थानिक  पुरुष व महिला उपोषणास बसल्या होत्या तेव्हा तत्कालीन तहसीलदार रचना पवार यांनी भुमी अभिलेख (सिटी सर्वे ऑफिस) यांना आदेश घेऊन तात्काळ मोजणीचे आदेश दिले होते तेव्हा सदरील सिटी सर्वे ऑफिस भुमिअभिलेख ऑफिस मार्फत मोजणी केली असता त्यांनी सदर व्यक्तीने या प्लॉटमध्ये अतिक्रमन केले आहे असा अभिप्राय दिला होता तेव्हा तहसीलदार यांनी स्थानिक पोलिसांना आदेश देऊन  दोन पोलिसांना सोबत घेऊन रस्ता मोकळा करून दिला होता तरी आता तीन वर्षांनी सदर व्यक्तीने त्याच जागेवरती अवैधरीत्या वॉल कंपाऊंड चे पोल उभे करून मागील रहिवाशांचा वहिवाटीचा व गणपती मंदिरात जाण्याचा रस्ता बंद केला आहे व सदरील व्यक्तीने नगरपंचायत बांधकाम परवानगी काढलेली आहे असे सदरील प्लॉट धारकाचे म्हणणे आहे तेव्हा नगरपंचायत कार्यालय येथे संपर्क साधला असता आम्ही फक्त त्यांना त्यांच्या खाजगी प्लॉट बांधण्याची परवानगी दिलेली आहे प्लॉट व्यतिरिक्त बांधकाम करण्याची परवानगी दिलेली नाही व असा वाद निर्माण झाल्यास ती बांधकाम परवानगी रद्द समजण्यात येईल अशी अट सुद्धा त्या परवानगीत टाकण्यात आलेली आहे असे नगरपंचायत कडून समजले तरी सदर प्रकरणात माननीय तहसीलदार  व नगरपंचायत मुख्य अधिकारी यांनी लक्ष देऊन तत्काळ न्याय मिळवून द्यावा अन्यथा या भागातील रहिवासी पुन्हा आमरण उपोषणास बसणार आहे असा  इशारा रहीवाश्यांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!