मुक्ताईनगरात प्रभाग १४ व १६ येथील रहिवाशांनी पाडले रस्त्याचे काम बंद
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुक्ताईनगर (अक्षय काठोके)। मुक्ताईनगर नगरपंचायत प्रभाग क्रमांक 14 व 16 येथील डांबरीकरण रस्त्याचे काम नगरपंचायत मार्फत चालू करण्यात आलेले होते परंतु येथील स्थानिक नागरिकांनि हे काम बंद पाडले आहे.
मुक्ताईनगर नगरपंचायत प्रभाग क्रमांक 14 व 16 येथील गजानन तळेले यांच्या घरापासून ते रमेश तळेले यांच्या घरापर्यंत डांबरीकरण रस्ता मंजूर करण्यात आलेला आहे व या रस्त्याचे काम नगरपंचायत मार्फत चालू करण्यात आलेले होते परंतु येथील स्थानिक नागरिकांचे असे म्हणणे आहे की हा रस्ता आधीच पंधरा वर्षानंतर तयार होतोय व आम्हाला तो डांबरीकरण नसून सिमेंट कॉंक्रीट चा रस्ता हवाय कारण डांबरीकरण चे जे रस्ते आजूबाजूच्या गल्लीमध्ये झालेले आहेत ते निकृष्ट स्वरूपाचे झाल्याचा आरोप येथील नागरिकांचा आहे त्यामुळे येथील नागरिकांनी तीव्र विरोध करून रस्ता बंद पाडला त्यावेळी जेसीबी चालक व रहिवाशांची बाचाबाची झाली तसेच या स्वरूपाचे निवेदन येथील रहिवाशांनी नगरपंचायत येथे दिलेले आहे निवेदन देतेवेळी संतोष सापधरे, अजय काठोके ,विनोद जैन, मनोज भलभले, विजय सापधरे ,मिलिंद खेवलकर,संजय तळेले उपस्थित होते तसेच निवेदनावर 70 80 नागरिकांच्या स्वाक्षर्या आहेत