मुक्ताईनगर

मुक्ताईनगर मध्ये अवैध गुटख्याची खुलेआम विक्री, याना आशीर्वाद कोणाचा ?

मंडे टू मंडे वृत्तसंकलन-MTM Newsnetwork।

मुक्ताईनगर (प्रतिनिधी)। शासनाने प्रतिबंधित केलेला व मानवी आरोग्यास अपायकारक असलेला केमिकलयुक्त गुटखा मुक्ताईनगर शहर व परिसरात मोठया प्रमाणावर अवैधपणे विक्री सुरू असून अनेक तरुणांचे आयुष्य उध्वस्त होत आहे,

शहरासह परिसरात आज पर्यंत मोठ्या प्रमाणावर अगदी बिनबोभाट पने गुटखा विक्री सुरू असून कोणत्याच एफडीएच्या अधिकाऱ्यांना भान राहिलेले नसल्याने वर्षातून एकदाच फक्त थातुर मातुर कारवाई करण्याचा देखावा करत असतात अवैध केमिकलयुक्त गुटख्यावर कारवाई होणे गरजेचे असताना प्रशासना कडून त्यांना नेहमीच अभय दिले जात आहे. शहराच्या मधोमध असलेला प्रवर्तन चौक पासुन ते बस स्टँड परिसरात गुटका माफिया हे खुलेआम गुटख्याची विक्री करताना दिसून येतात, त्यांच्याकडे हा गुटखा येतो तरी कुठून असा प्रश्न निर्माण केला जात आहे, केमिकलयुक्त गुटख्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण दिले जात असून अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. एवढे डोळ्यासमोर घडत असताना देखील प्रशासन मात्र त्याची दखल घेण्यास का तयार नाही ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शासनाच्या गुटखा बंद च्या घोषणा हवेतच विरल्या आहे, कितीही घोषणा केल्या तरी काही एक फरक पडत नाही. याउलट युवा वर्ग ही व्यसनाधीन होऊन अनेक प्रकारच्या कॅन्सर सारख्या आजाराने ग्रस्त होत असून बरबाद होण्याच्या मार्गावर आहे. मुक्ताईनगर सह जिल्ह्यात मोठया प्रमाणावर गुटका माफियांनी धुमाकूळ घातला असताना प्रशासन मात्र तोंडावर बोटे ठेऊन गप्प का ?

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!