भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगरशैक्षणिक

लोकनेते एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त घोषवाक्य स्पर्धा संपन्न…

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुक्ताईनगर,मंडे टू मंडे वृत्तसंकलन। लोकनेते मा. एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीमती जी.जी.खडसे महाविद्यालय मुक्ताईनगर व संवेदना फाउंडेशन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 22 ऑगस्ट 2021 ते 27 ऑगस्ट 2021 या कालावधीत राज्यस्तरीय ‘घोषवाक्य स्पर्धा-2021’ आयोजित करण्यात आली होती.

सदर स्पर्धेत “मा. एकनाथराव खडसे: सामान्य व्यक्ती ते असामान्य नेता” या विषयावर राज्यभरातून 147 स्पर्धकांनी ऑनलाइन पद्धतीने सहभाग नोंदविला. या स्पर्धेत श्री.विकास दत्तू जाधव (बारामती),कु.रामेश्वरी प्रमोद धामोळे (बोदवड) व श्री.आशिष गजानन टोंगळकर (जळगाव जामोद) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. विजेत्या स्पर्धकांना लोकनेते श्री. एकनाथराव खडसे यांच्या शुभहस्ते बक्षीस म्हणून अनुक्रमे 3000 रुपये,2000 रुपये,1000 रुपये व प्रमाणपत्र दिनांक 3 सप्टेंबर 2021 रोजी वितरित करण्यात आले. सदर स्पर्धेच्या आयोजनासाठी मा.अॅड.सौ.रोहिणीताई खडसे-खेवलकर (अध्यक्ष,संवेदना फाउंडेशन, जळगाव) व प्रा.डाॅ.एच.ए.महाजन (प्र.प्राचार्य श्रीमती जी.जी.खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर) यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.ए.पी.पाटील, प्रा.डाॅ.डी.एन.बावस्कर, प्रा.डाॅ.एस.के.थोरात,प्रा. एल.एल.भंगाळे, प्रा.डाॅ.ए.सी.बढे प्रा.डॉ.व्ही.बी.डांगे यांनी अथक परिश्रम घेतले. तर सदर स्पर्धेचे परीक्षण श्री.समाधान गायकवाड (जे.ई.स्कूल, मुक्ताईनगर), प्रा.डाॅ.जी.एस.चव्हाण ,प्रा.डाॅ.के.एन.गायकवाड(खडसे महाविद्यालय) यांनी केले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!