भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगर

कामगार संघटनांच्या भारत बंद ला मुक्ताईनगर मध्ये काँग्रेससह, राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेनाचा पाठिंबा

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

मुक्ताईनगर, मंडे टू मंडे वृत्तसेवा। केंद्र सरकारने केलेल्या शेतकरी विरोधी काळे कायदे विरोधात शेतकऱ्यांनी एकत्र येऊन भारत बंदचे आवाहन केले होते त्या बंदला मुक्ताईनगर तालुका काँग्रेस पक्षाने जाहीर पाठिंबा देऊन त्यासंदर्भात विविध बाबींवर तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले, निवेदनामध्ये शेतकरी विरोधी तीन काळे कायदे, वाढते पेट्रोल ,डिझेल व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या दरांवर नियंत्रण ठेवण्यास केंद्र सरकार सपशेल अपयशी ठरण्याचे म्हटले आहे,

मुक्ताईनगर तालुका काँग्रेस च्या नेतृत्वाखाली तसेच समविचारी पक्षांसमवेत मुक्ताईनगर येथे बंदला पाठिंबा देत व्यावसायिक व व्यापारी वर्गाला आवाहन करतांना सोबत या बंदला पाठिंबा देणाऱ्या पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनीही मोठ्या संख्येने भाग घेतला.यामध्ये जिल्हा सरचिटणीस डॉ.जगदीश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुकाध्यक्ष यु डी पाटील सर, काँग्रेस तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, माजी तालुकाध्यक्ष अरविंद गोसावी, मुक्ताईनगर शहराध्यक्ष प्रा.पवन खुरपडे, जिल्हा मागासवर्गीय उपाध्यक्ष बी डी गवई, अनिल वाडीले, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्ष सावकारताई, अँड.राहुल पाटील,सलिम मंत्री मागासवर्गीय तालुकाध्यक्ष निलेश भालेराव,पुंडलिक धायले, तालुका कार्याध्यक्ष राजू जाधव, निखील चौधरी, शेख भैया, अँड.गणेश महाजन, शिवाजी पाटील,आरिफ रब्बानी आनंदा कोळी , वसीम मान्सुरी, रवी जयकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते..

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!